एक फसलेला प्रयोग `एफ यू`
आज बॉक्स ऑफिसवर महेश मांजरेकर दिग्दर्शित `एफ यू` हा सिनेमा रिलीज झालाय. आकाश ठोसर, सत्या मांजरेकर, वैदेही परशुरामी, संकृती बालगुडे आदी लाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. कसा आहे हा सिनेमा.. काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी.. हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का. टाकूया एक नजर
जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई : आज बॉक्स ऑफिसवर महेश मांजरेकर दिग्दर्शित 'एफ यू' हा सिनेमा रिलीज झालाय. आकाश ठोसर, सत्या मांजरेकर, वैदेही परशुरामी, संकृती बालगुडे आदी लाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. कसा आहे हा सिनेमा.. काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी.. हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का. टाकूया एक नजर
कॉलेज मधल्या तरुणांची गोष्ट, त्यांचं जग, त्यांची स्वप्न बिग स्क्रिनवर रंगवण्याचा प्रयत्न निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एफ यू या सिनेमातून केलाय. साहिल, गटल्या, रेवती, तारा, मॅक, चिली या मित्रांची ही गोष्ट आहे. साहिल जी व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेता आकाश ठोसरनं, रेवतीला अर्थातच वैदेहीला एका शोच्या तालमी दरम्यान भेटतो आणि मग सिनेमा फ्लाशबॅकमध्ये जातो. स्ट्रेट टू द पॉईंट सांगायचं झालं तर सिनेमात स्टोरी नावाची गोष्टच नाही. यात फक्त या तरुणांची धमाल, मजा, मस्ती, लव-ब्रेक अप, त्यांचं जग, त्यांच्या वाईट सवयी, मग ते दारु पिणं असो, सिगारेट पिणं किंवा अगदी पॉर्न या सारख्या गोष्टींवर फोकस करण्यात आलाय.
कॉलेज लाइफवर आतापर्यंत आलेल्या सिनेमातला तोच तोच फ्लेवर एफ यू या सिनेमात भरभरुन पहायला मिळतो. मग तो हिरोचा अती फ्रेन्डली बाप असो किंवा शरद पोंक्षेंनी साकारलेल्या पात्रासारखा एखादा कडक आणि शिस्त प्रिय बाप. हिरो हिरोइनला भेटतो, पहिल्याच भेटीत हिरो तिच्या प्रेमात पडतो. एवढच काय तर भेटभेटल्याच स्वप्नात फॉरेन लोकेशनमध्ये गाणं ही रंगतं... या आणि या सारख्या असंख्य गोष्टी ज्या याआधीही आपण इतर सिनेमात पाहिल्यात किंवा रिलेट करता येतील अशी दृष्य एफ यूमध्ये पहायला मिळतात.
सिनेमाची कथा लिहिली आहे अभिजीत देशपांडे यांनी तर महेश मांजरेकर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. एफ यूमध्ये तब्बल 14 गाणी आहेत, असं असलं तरी हा सिनेमा म्युजिकल सिनेमा आहे असं म्हणणं कठीणच. सीनची गरज नसतानाही त्यात गाणी घुसवण्यात आलीयेत. सलमान खानच्या आवाजातील तुला पहावेसे वाटते हे गाणं पेप्पी वाटतं.
सिनेमाची मांडणी जरी फसलेली असली तरी सिनेमातली गाणी मात्र अती एक्सपेन्सीव्ह लोकेशनवर शूट करण्यात आलीयेत.. सिनेमावर भरपूर खर्च करण्यात आलाय. लॅव्हिश लोकेशन्स, कलाकारांचे महागडे कपडे या गोष्टींमुळे सिनेमा रिच दिसतो.
अभिनेता आकाश ठोसर सैराट या त्यांच्या पहिल्याच सिनेमातून सुपरस्टार झाला. आकाशचा सैराट सिनेमातला देशी अंदाज प्रेक्षकांना भावला होता. या सिनेमात आकाश एका श्रीमंत आणि एज्युकेटेड घराण्यात वाढलेला, कॉलेजचा स्टार, अशा व्यक्तिरेखेत दिसतो. सिनेमातला त्याचा वावर आणि अभिनय पाहता या कॅरेक्टरसाठी तो हवा तितका तयार वाटत नाही.. त्यात अधून मधून त्याला इंग्रजीतून संवादही साधावे लागलेत, ज्यात तो अजिबात कंफर्टेबल जाणवत नाही. आकाशला आता इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी सिनेमांची योग्य निवड करणं महत्वाचं ठरणार आहे.
'एफ यू' या सिनेमाचं दिग्दर्शन, कथा, पटकथा सगळंच फसलंय. या सिनेमातले हे सगळे फॅक्टर्स या सिनेमाला मिळतायत 2 स्टार्स.