मुंबई : फुकरेचा सिक्वेल फुकरे रिटर्न्स हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या सिनेमाने दमदार कमाई केलीये. शुक्रवारी हा सिनेमा रिलीज झाला. पहिल्याच दिवशी या सिनेमाने भारतात ८.१० कोटी रुपयांची कमाई केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाची कथा चांगली असली तरी पहिल्या सिनेमाच्या तुलनेत पटकथा सिक्वेलमध्ये फसल्याचे दिसते. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन फुकरे रिटर्न्सच्या कलेक्शनची माहिती दिली.


इतकी केली कमाई


ते म्हणाले, बिग बँगसह फुकरे रिटर्न्सने सुरुवात केली. #FukreyReturns सिनेमाने पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई केली. शुक्रवारी या सिनेमाने ८.१० कोटी रुपये कमावले. ढासू ओपनिंगसह या सिनेमाने स्पष्ट केलंय की या वीकेंडमध्ये हा सिनेमा चांगली कमाई करणार आहे.


फुकरेची इतकी झाली होती कमाई


तरण आदर्श यांच्या मते २०१३मध्ये रिलीज झालेल्या फुकरे या सिनेमाने पहिल्या दिवशी २.६२ कोटी रुपयांची कमाई केली होती. वीकेंडमध्ये या सिनेमाने ९.८२ कोटी रुपये कमावले होते. सुरुवात धीमी झाल्यानंतर एका आठवड्यात १८.४२ कोटी रुपये कमावले होते.