मुंबई : तैमूर अली खानचा फोटो सोशल मीडियामध्ये शेअर झाला की तो व्हायरल होतोच. अवघ्या १० महिन्यांचा तैमूर सोशल मीडियामध्ये झटपट ट्रेंड होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करिना आणि सैफ त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहेत. अशावेळेस तैमूर तुषार कपूरच्या मुलासोबत खेळण्यात दंग होता. तुषारनेही या मुलांचा एकत्र खेळताना,मजामस्ती करतानाचा खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. आणि नेहमीप्रमाणेच नेटकर्‍यांनीही या फोटोवर शुभेच्छांचा आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. 



 


या फोटोला कॅप्शन देताना तुषारने ‘थ्री कंपनी’असे लिहून #johnyjohnyyespapa #thewheelsonthebus #nurseyrhymes असे  हॅशटॅगही वापरले आहेत. 


जून महिन्यात  तैमूर तुषार कपूरचा मुलगा लक्ष्यच्या पहिल्या वाढदिवसाला गेला होता.  तुषार कपूर सरोगसीद्वारे गेल्या वर्षी बाबा झाला तर करिनाने डिसेंबर महिन्यात तैमुरला जन्म दिला.



 


 नुकतेच तुषारने लक्ष्यला त्याच्यासोबत हैदराबादला ‘गोलमाल’या चित्रपटाच्या चित्रीकरणाला घेऊन गेला होता. करिनाही ‘वीरे दी वेडिंग’च्या चित्रीकरणाला तैमुरला घेऊन दिल्लीत गेली होती. एका फोटो अ‍ॅडच्या शूट दरम्यान तैमूर सेटवरही आला होता.