मुंबई : फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्यासाठी भारतीय कलाकारांना चेतावणी दिली आहे. FWICE सोशल मीडियावर एक पत्र प्रसिद्ध केलं आहे. काही भारतीय कलाकारांनी गायक राहत फतेह अली खानसोबत एका डिजिटल ऑनलाईन कॉन्सर्टमध्ये भाग घेतला, त्यानंतर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने त्यांना चेतावणी दिली आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी गायक, तंत्रज्ञ, कलाकारांसोबत काम करु नये असं आधीच सांगण्यात आलं आहे. डिजिटल ऑनलाईन कॉन्सर्टमध्ये देखील नाही. FWICEने अतिशय कडक शब्दांमध्ये चेतावणी दिली आहे. शिवाय अधिकृत विधान देखील जारी केलं आहे. असं वक्तव्य तरण आदर्श यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करताना केलं आहे. 



'FWICEने बजावून देखील काही भारतीय कलाकांनी राहत फतेह अली खानसोबत मंच शेअर केला आहे. एकीकडे संपूर्ण देश कोरोनासोबत दोन हात करत आहे, पण पाकिस्तान मात्र सीमेवर आपल्या सैनिकांना मारण्यात व्यस्त आहे.' असं देखील या पत्रकात नमूद केलं आहे. पण या पत्रकात भरतीय कलाकारांची नावे नमूद करण्यात आलेली नाहीत. 


गेल्या वर्षी पाकिस्तानने केलेल्या पुलवामा दहशदवादी हल्ल्यानंतर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे अध्यक्ष  अशोक पंडित यांनी पाकिस्तानी कलाकारांवर पूर्णपणे बंदी घातली होती.