Gajraj Rao : बॉलिवूड अभिनेता गजराज राव यांना कोणत्या ओळखीची गरज नाही. त्यांना आजा सगळेच लोक ओळखतात. गजराज राव हे नुकतेच कार्तिक आर्यनच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात दिसले आहेत. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेनं सगळ्यांची मने जिंकली आहेत. 1994 साली प्रदर्शित झालेल्या 'बॅन्डिट क्वीन' या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पण त्यांना त्या चित्रपटात यश मिळालं नाही. त्यांना लोकप्रियता मिळवण्यासाठी खूप वेळ गेला. त्यांनी करिअरमध्ये खूप स्ट्रगल केलं आहे. उपाशी राहण्यापासून लोकांच्या शिव्या देखील ऐकल्या आहेत. त्यामुळे आता त्यांनी निर्णय घेतला आहे की ते आता त्यांच्या मानधनात कोणतीही कपात करणार नाहीत. गजराज राव यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गजराज राव यांनी वरुण दुग्गीच्या पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे की त्यांचा कोणी सपोर्ट सिस्टम नव्हतं. एक वेळ अशी आली होती जेव्हा त्यांची आर्थिक स्थिती ही खूप खराब झाली होती. गजराज राव म्हणाले आता या गोष्टी एसी मध्ये बसून बोलणे सोपे आहे, परंतु जेव्हा तुमच्याकडे  खायला अन्न नसते तेव्हा तुमची सर्व स्वप्ने  एका क्षणात विस्कटून जातात 



25-30 वर्षांच्या संघर्षानंतर परिस्थिती सुधारली. गजराज राव यांनी 25-30 वर्षे कठोर परिश्रम केल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती आता स्थिर असल्याचे म्हटले आहे. गजराज यांना आता महागडे फोन घ्यायल, प्रवास करायला आणि चांगल्या हॉटेलमध्ये रहायला आवडते. गजराज म्हणाले म्हणाला, "मला हे स्वीकारायला लाज वाटत नाही. पंचतारांकित हॉटेल्स आणि बिझनेस क्लासमध्ये प्रवास करायला मला लाज वाटत नाही. मला या सगळ्या गोष्टी माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी हव्या आहेत. मला घरात कोणी आजारी पडल्यास आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी दहा वेळा विचार करायची गरज पडायला नको "


गजराज फी कमी करण्यास नकार का देतात, याविषयी सांगताना म्हणाले, "कास्टिंग डायरेक्टरने मला फी कमी करण्यास सांगितले होते आणि फक्त 20 दिवस काम असल्याचं सांगितलं. मी म्हणालो की मी त्या 20 दिवसांसाठी खूप जास्त पैसे आकारत नाही आहे. मी विनामूल्य काम करतोय, मी यावर पुढे  म्हणालो की आज या ठिकाणी पोहोचण्यासाठी मी अनेक वर्षांपासून केलेल्या होमवर्कसाठी हे पैसे आहेत. 20 दिवस 20 कप चहावर जगलो, उपाशी झोपलो, शिव्या ऐकल्या ही त्या दिवसांची माझी फी आहे. टाऊनमधून अंधेरीला चालत जायचो. हे 20 दिवस तर विनामूल्य आहेत.


 हेही वाचा : "11 महिने ऑस्ट्रेलियात टॅक्सी ड्रायव्हरचं काम...", Harrdy Sandhu नं सांगितला क्रिकेटर ते गायक होण्याचा प्रवास


गजराज राव यांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ते लवकरच ‘मैदान’ आणि 'ट्रायल पीरियड' या चित्रपटात दिसणार आहेत. 29 जून रोजी प्रदर्शित झालेल्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात ते दिसले होते. मार्च 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भोला’ या चित्रपटातही गजराज यांनी अजय देवगणसोबत काम केले.