मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर 'गली बॉय'  यशाच्या सिनेमाला प्रक्षकांकडून उत्सर्फूत प्रतिसाद मिळाला. यशाच्या शिखरावर स्वार असताना सलग दुसऱ्या आठवड्यात सिनेमच्या कमाईचा वेग मंदावला आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी स्वत:च्या टि्वटर अकाउंटवरुन सिनेमाच्या कमाईची अधिकृत घोषणा केली आहे. १०० कोटींच्या घरात पोहचलेल्या सिनेमाला उतरती कळा लगली असल्याचे त्याच्या पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे. 'लुका छुपी' आणि 'सोनचिड़िया' हे दोन सिनेमे येत्या शुक्रवारी सिनेमागृहात दाखल होणार आहेत. हे दोन सिनेमे प्रदर्शित झाल्यानंतर 'गली बॉय' सिनेमा बॉक्स ऑफिसवर टिकेल की नाही यावर शंका व्यक्त करण्यात येत आहे. सिनेमाने आतापर्यंत १२० कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे. 'गली बॉय' सिनेमा देशभरात एकूण ३३५० सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


सिनेमाचे दिग्दर्शन जोया अख्तरने केले असून निर्माती फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी केली आहे. सिनेमात मुख्य भूमिकेत रणवीर सिंग आणि आलिया भट झळकत आहेत. कलकी कोचलिन सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.


मुस्लिम मुलीची भूमिका आलिया भट बजावत आहे.तिच्या आशा स्वभावाचं आणि कामाचं सर्वत्र कौतूक होत आहे. रणवीर सिंग प्रत्येक सिनेमात आपली भूमिका चोख पार पाडतो. कोणतेही पात्र तो त्याच्या अभिनयातून जिवंत करतो.'गली बॉय'मध्ये चाहत्यांना अनेक गोष्टी एकत्र अनुभवायला मिळाल्या आहेत. ज्यामध्ये रॅप, हिप-हॉप संगीत आहे. मुंबईच्या झुग्गी-झोपडीमध्ये राहणाऱ्या दोन लोकांची ही गोष्ट आहे. जे त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर देशातील मोठे रॅपर बनतात.रणवीर सिंगची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसत आहेत.