बाप्पा मोरया रे... अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी गणपतीचं आगमन
आज सर्वांचा लाडका बाप्पांचं आगमन घरा-घरांमध्ये होत आहे.
मुंबई : आज सर्वांच्या लाडक्या बाप्पांचं आगमन घरा-घरांमध्ये होत आहे. अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी देखील गणपतीचं आगमन झालं. स्वप्निलच्या मुंबई येथील राहत्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. तर दीड दिवसांसाठी स्वप्निलच्या घरी गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा केली जाणार आहे. मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने स्वप्निलने त्याच्या कुटुंबासोबत बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली आहे. बाप्पाच्या आगमनाने सर्व विघ्न दूर होतील अशी प्रार्थना देखील गणरायाच्या चरणी केली.
'मखर केल्यामुळे बप्पा सगळीकडून दिसत नाही, दीड दिवसासाठी बाप्पा येतात त्यामुळे ते सगळीकडून दिसले पाहिजेत. पुर्वी घर लहान असायचे त्यामुळे फार अडगळीत बाप्पा यायाचे.' असं म्हणत स्वप्निलने संपूर्ण श्रेय कुटुंबाला दिलं.
यंदा देशावर करोना विषाणूचं सावट आहे. त्यामुळे प्रत्येक जण हा मोठा उत्सव अगदी साध्या पद्धतीने करताना दिसत आहे. चैतन्याच्या, आनंदाच्या या उत्सवात सामाजिक आणि सुरक्षिततेचे भान ठेवून हा सण साजरा करण्याचे आवाहन राज्य शासनाकडून केले जात आहे.
गणराजा म्हणजे साक्षात विघ्नहर्ता. या विघ्नहर्त्याच्या आगमनाने देशावरच नाही तर संपूर्ण जगावर आसलेलं कोरोनाचं सावट लवकरात-लवकरत दूर होईल अशी प्रार्शना आज प्रत्येक भक्त करत आहे. देशातील नागरिक यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करताना दिसत आहेत.