मुंबई : हिंदी कलाविश्वात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या काही सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेता सलमान खान याच्या कुटुंबाचं नाव अग्रस्थानी येतं. अतिशय भव्य अशा स्तरावर खान कुटुंबीय हा उत्सव साजरा करतात. लाडक्या गणरायाची आपल्या घरी प्रतिष्ठापना करत त्याची मनोभावे पूजाअर्चाही करतात. इतकंच नव्हे, तर बाप्पाच्या विसर्सजनाच्या वेळीसुद्धा सलमानसह या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा आनंद आणि उत्साह पाहण्याजोगा असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या वर्षी हे चित्र पाहता येणार नाही. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पाळण्यात येणाऱ्या सावधगिरीमुळं यंदा बाप्पाच्या सेवेतही या कोरोना संकटाची किनार दिसून येत आहे. पण, असं असतानाच सलमानचे गणपती दरम्यानचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तो ढोल- ताशाच्या गजरामध्ये भाईजान मोठ्या उत्साहात थिरकताना दिसत आहे. 


अनेक चाहते आणि फॅन पेजच्या माध्यमातून सलमानचा हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. जो कित्येक नेटकऱ्यांनी शेअर केला आहे. तर, काहींनी त्यावर कमेंट केली आहे.




यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सवाबाबत सांगावं तर, सलमानचा भाऊ सोहेल खान याच्या घरी यंदा खान कुटुंबाच्या गणपती बाप्पांची प्रतिष्ठापऩा करण्यात आली आहे. सलमानने त्याची तथाकथिक प्रेयसी लूलिया वंतूर आणि इतर कुटुंबीयांसह गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.