मुंबई : काही दिवसांपूर्वीच यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली. दरवर्षी या मंगलपर्वाची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत असतात. यंदाही अशीच वाट पाहिली गेली. उत्साहात बाप्पांचं स्वागतही झालं. पण, या साऱ्याला किनार होती ती म्हणजे coronavirus कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाची. कोरोनाचा प्रसार अतिशय झपाट्यानं होत असल्याचं पाहत संभाव्य धोका टाळण्यासाठी म्हणून यंदा बऱ्याच मोठ्या आणि मानाच्या गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव अतिशय साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील मानाच्या आणि लाखोंचं श्रद्धास्थान असणाऱ्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना न करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. 


मूर्तीच्या प्रतिष्ठापनेऐवजी यंदा या मंडळानं मोठ्या स्तरावर आरोग्य शिबीराचं आयोजन केलं. याच शिबीरात जाऊन एका वेगळ्या पद्धतीनं बॉलिवूड सेलिब्रिटीनं आपली श्रद्धासुमनं अर्पण केल्याचं पाहायला मिळालं. यंदाच्या वर्षी देवाकडून काहीतरी मागण्यापेक्षा गरजवंतांसाठी काहीतरी दान केल्याची समाधानाची भावना या सेलिब्रिटीनं एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून शेअर केली. 


लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात जाऊन रक्तदान करणारा हा सेलिब्रिटी म्हणजे लोकप्रिय आणि आघाडीचा नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा. बाप्पानं आपल्यावर कायमच त्याचे आशीर्वाद ठेवले आहेत, असं म्हणत रेमोनं रक्तदान केल्यानंतर आपली भावना व्यक्त केली. सोबतच त्यानं मंडळाच्या या उपक्रमाची प्रशंसाही केली. 



 


रक्तदान करण्यासाठी म्हणून आलेल्या रेमोनं मास्क, हेड कव्हर, अल्होहोल व्हाईप्स, ग्लोव्ह्ज, शू कव्हर आणि सॅनिटायझर अशी आवश्यक सामग्री दानही केली. सोशल मीडियावर रेमोच्या या आगळ्यावेगळ्या