नवी दिल्ली : रणवीर कपूरचा सिनेमा 'संजू' २९ जूनला रिलीज झाला. संजय दत्तच्या या बायोपिकने बॉक्स ऑफिसवर ३३० कोटीहून जास्त कमाई केलीयं. दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि निर्माता विधु विनोद चोप्रा यांनी या सिनेमात संजय दत्तच्या आयुष्यातील अनेक घटना समोर आणल्या आहेत. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमने संजू चित्रपट निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. संजू चित्रपटात आपल्याबाबत चुकीची माहिती दिली असून त्याबाबत आपली माफी मागावी अशी मागणी त्यानं केली आहे. पंधरा दिवसांमध्ये चित्रपट निर्मात्यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं त्यानं या नोटीसमध्ये म्हटलं आहे.


१५ दिवसात उत्तर 


अबू सालेमच्या वकिलाने पाठवलेल्या या नोटीसमध्ये संजू सिनेमातील अनेक सिन्सवर आक्षेप घेतलाय. अबू सालेम किंवा त्याचा कोणताच मित्र संजय दत्तला हत्यार पुरवत नसल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. अबू सालेमतर्फे राजकुमार हिरानी आणि विधु विनोद चोप्राला नोटीस पाठवत १५ दिवसात उत्तर मागितले आहे. याचे उत्तर न दिल्यास अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे त्याने म्हटले आहे.