Gauahar Khan ने ब्लॅक गाऊनमध्ये क्यूट बेबी बंप केला फ्लॉन्ट, फोटो व्हायरल
टीव्ही इंडस्ट्रीतली ग्लॅमरस अभिनेत्री गौहर खान (Gauhar Khan) लवकरच आई होणार आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नुकतीच आई झाली आहे. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. तिच्यानंतर आता आणखीण एक प्रसिद्ध अभिनेत्री आई होणार आहे. याबाबत या अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून माहिती दिली आहे. दरम्यान ही अभिनेत्री कोण आहे, ते जाणून घेऊयात.
टीव्ही इंडस्ट्रीतली ग्लॅमरस अभिनेत्री गौहर खान (Gauhar Khan) लवकरच आई होणार आहे. गौहरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे. या तिच्या घोषणेनंतर चाहते आणि सहकलाकार तिचे अभिनंदन करत आहे.
अभिनेत्री गौहर खान तिच्या गरोदरपणातील प्रत्येक क्षणाचा मोकळेपणाने आनंद घेत आहे. अलीकडेच, अभिनेत्री गौहर खानने हॉकी वर्ल्ड कपल 2023 कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यानंतर अभिनेत्री अतिशय सुंदर काळ्या गाऊनमध्ये तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करायला विसरली नाही.
गौहर खान गरोदरपणातही करत आहे काम
अभिनेत्रीने तिचे नवीन फोटो शेअर केले आणि चाहत्यांना सांगितलं की ती हॉकी विश्वचषक 2023 चं आयोजन करण्यात व्यस्त आहे. त्यानंतर अभिनेत्रीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
काळ्या गाऊनमध्ये अभिनेत्रीने बेबी बंप दाखवला
अभिनेत्री गौहर खान होस्टिंगपासून मुक्त होताच या अतिशय सुंदर गाऊनमध्ये तिचे फोटो क्लिक केले. यादरम्यान अभिनेत्रीने तिचा बेबी बंप चाहत्यांसोबत फ्लॉन्ट केला. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री गौहर खान सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. यादरम्यान तिचे अनेक फोटो चाहत्यांमध्ये व्हायरल झाले आहेत.
गौहर खान लग्नाच्या 2 वर्षांनी आई होणार आहे
टीव्ही सीरियल आणि फिल्म अभिनेत्री गौहर खानने 2020 मध्ये तिचा बॉयफ्रेंड जैद दरबारसोबत लग्न केलं. अभिनेत्री गौहर खान लग्नाच्या 2 वर्षानंतर आई होणार आहे.