गौहर खानने शिल्पा शिंदेला दिल्या शुभेच्छा ! मात्र `या` कारणांमुळे चाह्त्यांनी केलं ट्रोल
बिग बॉस 11 चं विजेतेपद मिळावल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शिंदेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मुंबई : बिग बॉस 11 चं विजेतेपद मिळावल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शिंदेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान बिग बॉसच्या 7व्या पर्वाची विजेती गौहर खाननेदेखील शिल्पाला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र शिल्पाच्या चाहत्यांनी गौहर खानला ट्रोल केलं आहे.
का झाली गोहर खान ट्रोल ?
गौहर खानने ट्विटरच्या माध्यमातून शिल्पाला शुभेच्छा दिल्या. मात्र या शुभेच्छा 16 जानेवारीच्या रात्री देण्यात आला. शिल्पा गेल्या रविवारी म्हणजे 14 जानेवारीला बिगबॉसची विजेती झाल्याचे घोषित करण्यात आले.
दरम्यान गौहर खानने ती व्हेकेशनवर होती. त्यामुळे बिग बॉसचं 11 वं पर्व कोण जिंकलं हे समजायला उशीर झाला असा खुलासा केला आहे.
चाहत्यांनी घेतला समाचार
गौहरला व्हेकेशन दरम्यान स्नॅपचॅट करायला वेळ मिळाला. इतर ट्विटसाठी वेळ होता. गौहर अशा कोणत्या ठिकाणी गेली होती ? जेथे स्नॅपचॅट करायला रेंज होती मात्र ट्विटर नव्हतं ? असा खोचक प्रश्न गौहरला विचारण्यात आला आहे.
एका चाह्त्यांनं तर इतर ट्विट केलेस? मग या ट्विटलाच उशीर असा प्रश्न विचारला होता.
गौहर विकासची चाहती
बिग बॉस 11 पर्वाच्या अनेक एपिसोड्सनंतर गौहर ट्विटरवर आपली मतं मांडत होती. त्यानंतर विकास गुप्ता जिंकावा यासाठी अपिलही करण्यात आलं होतं.