मुंबई :बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजामुळे चांगलीच चर्चेत असते. नवीनवीन लूकमधील फोटो ती इंस्टाग्रामवर शेअर करताना दिसते. त्यात तिच्या हटके स्टाईलिंगची ही विशेष चर्चा पाहायला मिळते. सोशल मीडियावर देखील गौहरचा मोठा चाहतावर्ग आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2020 च्या शेवटी गौहरने टीक टॉक स्टार आणि डान्सर जैद दरबारसोबत विवाहगाठ बांधली. त्यानंतर ही जोडी हनीमूनला कुठे जाणार याबाबत देखील त्यांना बऱ्याचदा  विचारण्यात आलं. पण कोरोनामुळे या दोघांनी आपला हनीमूनचा प्लॅन पुढे ढकलला. 


आता फायनली हे लव्ह बर्डस् हनीमून सेलिब्रेशनसाठी परदेशात गेले आहे. रशियामध्ये हे दोघे हनीमूनसाठी गेले आहेत. गौहरने नुकतेच काही फोटोज आपल्या  इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.



या जोडीचा रशियाच्या सेंट बेसिल कॅथेड्रल येथील एक फोटो सध्या कमालीचा व्हायरल होतोयं.यात भर रस्त्यात गौहरने पतीला KISS  करत आपलं प्रेम जाहीर केलंय.



तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केलायं.दोघांचे फोटो आणि व्हिडिओ बऱ्याचदा व्हायरल होत असतात. जैद एक उत्तम डान्सर असल्याने  बऱ्याचदा तो पत्नी गौहरसोबत नवनवीन डान्स व्हिडिओ शेअर करत असतात.