मुंबई :  येत्या १ ऑक्टोबर पासून 'बिस बॉस'चा अकरावा सीझन रसिकांच्या भेटीला येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक सीझनची एक वेगळी थीम असते. यंदाचा सीझन हा 'शेजारी शेजारी'च्या थीमवर बेतलेला आहे. 
'बिग बॉस'च्या काही ट्रेलरमधून यंदाच्या सीझनमध्ये शेजार्‍यामधील धमालमस्ती आणि भांडणं ही दोन्ही बघायला मिळणार याची खात्री पटली असेल. पण थेट 'बिग बॉस'च्या घराचा शेजारी कोण आहे ? हे तुम्हांला ठाऊक आहे का? 


'पिंकी पडोसन' ही बिग बॉसची शेजारी आहे. नुकतीच 'तिची' खास झलक दाखवण्यात आली आहे. अभिनेता गौरव गेरा 'पिंकी पडोसन'च्या रूपात आहे. 'बिग बॉस'च्या घरातील  खास खबरी 'पिंकी पडोसन'च्या रूपात तो रसिकांसमोर ठेवणार आहे. 




गौरव गेरा 'जस्सी जैसी कोई नही' या मालिकेतून घराघरात पोहचलेला प्रसिद्ध चेहरा आहे. यंदा सलमान खानच्या  खुसामदार अ‍ॅंकरिंग सोबत 'पिंकी पडोसन'ची गॉसिप्स शोची मज्जा किती रंगवणार हे पाहणं औत्स्युक्याचे ठरणार आहे.  


'बिस बॉस ११' सीझनमध्ये नेमके कोण आणि किती स्पर्धक भाग घेणार याबाबतच्या सार्‍या गोष्टी गुपित असल्या तरीही काही सेलिब्रेटी स्पर्धक आणि काही सामान्य प्रेक्षकांना यंदाच्या सीझनमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.