Gaurav More Emotional : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता गौरवे मोरे आता हिंदी कॉमेडी शोमध्ये दिसतोय. या शोमध्ये तो धुमाकूळ घालताना दिसतोय. गौरव मोरे हा ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी शोमधून आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करताना दिसतोय. तर याच शोमध्ये सगळ्यांना हसवणारा गौरव हा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. या शोमध्ये वडिलांच्या आठवणी सांगताना गौरव भावूक झाला. त्याच्या वडिलांच स्वप्न पूर्ण झालं पण ते पाहण्यासाठी तेच नाही अशा शब्दात त्यानं सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘मॅडनेस मचाएंगे’ या शोचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावेळी या शोमध्ये एक सेगमेन्ट होता. त्यात प्रत्येक कलाकार हा त्यांच्या आठवणी सांगताना दिसला. यावेळी जेव्हा गौरवची वेळ आली तेव्हा त्यानं त्याच्या वडिलांच्या स्वप्नाविषयी सांगितलं आहे. "माझे वडील नेहमी बोलायचे आपल्या घरात चारचाकी पाहिजे. तेव्हापासून मी ठरवलं होतं की, सेकंड हँड असली तरीही आपल्या घरात चारचाकी गाडी आली पाहिजे. कारण लोकांना ज्याच्या घरासमोर कार असते तोच माणूस मोठा वाटत असतो. त्यावेळी मी एका शोमध्ये काम करत होतो. या शोमधून मिळालेले पैसे साठवले आणि कार घ्यायचे ठरवले. मला एक व्यक्ती भेटला, त्याने दीड लाखात कार देणार असल्याचे म्हटले. पण, माझ्याकडे त्यावेळी 1 लाख 10 हजार रुपये होते आणि मी त्याला ते सांगितलं. बाबांची इच्छा म्हणून कार घेतली. घरी कार आली पण बाबा आम्हाला सोडून गेले. माझ्या गाडीत बाबांशिवाय इतर सगळेजण बसतात. पण, आता नवीन कार घेतल्यावर त्यात बाबांचा फोटो ठेवेल आणि चला आपण एकत्र प्रवास करतोय असं तरी म्हणेन", असं गौरव म्हणाला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हेही वाचा : करण जोहरनं लग्न का केलं नाही? कारण सांगत म्हणाला...


दरम्यान, काही दिवसांपूर्वी गौरव मोरेनं महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कॉमेडी शो सोडल्यानं त्याच्या सगळ्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर हा शो सोडल्याची बातमी देत गौरव मोरे देखील भावूक झाला होता. त्यानं त्याच्या 'आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा, टा ना ना ना…' अशी सुरुवात केली आणि त्यानंतर त्यानं प्रेक्षकांचे आभार मानले.