करण जोहरनं लग्न का केलं नाही? कारण सांगत म्हणाला...

Karan Johar : करण जोहरनं एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. 

दिक्षा पाटील | Updated: May 25, 2024, 01:23 PM IST
करण जोहरनं लग्न का केलं नाही? कारण सांगत म्हणाला... title=
(Photo Credit : Social Media)

Karan Johar : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शकांमध्ये करण जोहरचं नाव येतं. करण हा सगळ्यात यशस्वी असणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये मोजला जातो. आज 25 मे रोजी करण जोहरचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. करण विषयी त्याच्या चाहत्यांना अनेक प्रश्न पडल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. त्यातही त्याच्या खासगी आयुष्यावर अनेकांना प्रश्न असतात. करणनं एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी करणच्या चाहत्यांनी त्याला लग्नासंबंधीत प्रश्न विचारले. 

एका जुन्या मुलाखतीत करणला त्याच्या चाहत्यानं त्याच्या चित्रपटात लग्नाचे सीक्वेंस खूप दाखवण्यात येतात. पण खऱ्या आयुष्यात लग्नावर त्याचा किती विश्वास आहे? यावर करणनं सांगितलं की मी काय बोलू, लग्न करायचंय तर करुन घ्या. लग्न करायचं नसेल तर नका करु. माझ्या नशिबात लग्न नसेल, त्यामुळे मी नाही केलं. लग्न न करणं माझा खासगी निर्णय आहे. पण मी लग्नात विश्वास ठेवतो का? यावर बोलण्यासाठी माझ्याकडे खूप काही आहे. मी हेच सांगेन की तुम्हाला तुमचं मन जे काही सांगेल ते करा. ही गोष्ट लक्षात ठेवा की कोणी तुमच्यावर लग्न करण्यासाठी किंवा करिअर निवडण्यासाठी जबरदस्ती करु नका. मग ते कुटुंब असो, समाज असो किंवा आसपासची लोकं असो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पुढे करण म्हणाला, 'तेच करा जे तुमचं मन सांगतय. मी तुमची खासगी निवडण असण्यावर बोलतो. मग ते प्रेमा संबंधीत, लग्नाविषयी किंवा मग करिअर संबंधीत असो.'

हेही वाचा : 'मंगळसूत्र विकलं पार्टटाइम नोकरी केलीस पण...', अभिनेत्याची आईसाठी भावूक पोस्ट

दरम्यान, इंडस्ट्रीमध्ये करणला केजो बोलतात. करणनं त्याच्या धर्मा प्रोडक्शनमधून अनेक कलाकारांना बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी मदत केली आहे. केजोला दोन मुलं असून त्यांची यश आणि रुही अशी नावं आहेत. करणच्या आयुष्यात असे चित्रपट बनवले आहेत जे प्रेक्षकांच्या मनात आजही घर करुन गेले. यात  'कभी खुशी कभी गम', 'कुछ कुछ होता है', 'कभी अलविदा ना कहना' आणि 'मय नेम इज खान' हे चित्रपट आहेत. करणच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. करण जोहरच्या नेटवर्थविषयी बोलायचे झाले तर ती एकूण 1740 कोटी असल्याचं रिपोर्ट्समध्ये म्हटलं जातं.