Gaurav More News: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा एकदा सुरू होते आहे त्यामुळे याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. 14 ऑगस्ट रोजी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' लवकरच सुरू होते आहे. याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. हा शो महाराष्ट्रातल्या सर्वांचाच आवडता आहे. त्यामुळे याची सर्वत्र चर्चा होताना दिसते. बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' परत प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. त्यामुळे याचे प्रोमोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सईनंंही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या सेटवरून लाईव्ह व्हिडीओ केला होता. तर प्राजक्ता माळीनंही आपल्या इन्टाग्राम पेजवरून याचाच एक फोटो शेअर केला होता त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे प्रेक्षकांचीही उत्सुकता अगदी शिगेला पोहचली आहे. त्यावरून सध्या चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेली पाच वर्ष 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते आहे. त्यामुळे या शोला एकप्रकारे ब्रेक लागल्यानं मात्र प्रेक्षक उदास झाले होते परंतु आता पुन्हा एकदा नव्या फॉर्ममध्ये ही शो प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील सर्वच कलाकार हे लोकप्रिय आहेत त्यामुळे त्यांची जोरात चर्चा होताना दिसते. यावेळी मात्र सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत ते म्हणजे कोणकोणते कलाकार हे यावेळी या शोमधून येणार आहेत. गौरव मोरे, वनिता खरात, शिवाली परब, समीर चौघुले यांचे सर्वांचे फॅन्स आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची संपुर्ण टीम ही अमेरिकेचा दौरा करून आली होती. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली होती. सोशल मीडियावरही त्यांचे फोटोज हे व्हायरल होत होते. 


हेही वाचा - राकेश बापटनंतर The kerala Story फेम अदा शर्मा रूग्णालयात; नक्की काय झालं?


सर्वांना उत्सुकता आहे की 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरे येणार का? गौरव मोरे आपल्या इन्टाग्राम पेजवरूनही फार एक्टिव असतो. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. आता त्याच्याबद्दलही मोठी अपडेट आलेली आहे.  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मध्ये गौरव मोरे दिसणार की नाही हे आपल्या हा एपिसोड सुरू झाल्यावरच कळेल. परंतु गौरव मोरे हा लवकरच एका चित्रपटातून दिसणार आहे. 


'अंकुश' या चित्रपटातून गौरव मोरे दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ही राजाभाऊ अप्पाराव घुले यांनी केली आहे. या चित्रपटातील त्याचा नवा लुक समोर आला आहे. यामध्ये तो मंग्या दादाची भूमिका करणार आहे. या चित्रपटात गायिका केतकी माटेगावकर, सयाजी शिंदे, मंगेश देसाई, चिन्मय उद्गीरकर यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 6 ऑक्टोबर 2023 ला प्रदर्शित होतो आहे. छोट्या पडद्यानंतर आता गौरव मोठ्या पडद्यावरही आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतो आहे. या चित्रपटापुर्वी तो 'हवाहवाई' या चित्रपटातून दिसला होता.