Sooryavansham Gauri : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा 1999 मध्ये प्रदर्शित झालेला 'सूर्यवंशम' हा चित्रपट सगळ्यांनीच अनेकदा पाहिला आहे. ईवीवी सत्यनारायण यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा डबल रोल होता. त्यांच्यातील अनेक भूमिका तर आता तुमच्या लक्षात राहिल्या असतील. इतकंच नाही तर या चित्रपटातील अनेक डायलॉग्स आहेत जे आता तुमचे पाठ झाले असतील. तर भूमिका देखील लक्षात राहिल्या असतील तर त्यापैकी एक गौरी ही भूमिका. मात्र, गौरी आता काय करते किंवा ती या चित्रपटानंतर अचानक कशी गायब झाली असा प्रश्न पडला असेल. चला तर आज त्याविषयी जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटात गौरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव रचना बॅनर्जी आहे. रचनाचा जन्म 2 ऑक्टोबर 1972 मध्ये झाला. तर रचनाचं नाव झुमझुम बॅनर्जी होतं. तिनं बंगाली आणि ओडिया चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यासोबत तमिळ, तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. तिनं इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर तिचं नाव बदलून रचना बॅनर्जी केलं. तिनं प्रोसेनजीत चॅटर्जी आणि चिरंजीवीसोबत स्क्रीन स्पेस शेअर केली आहे. 


रचना बॅनर्जीनं तिच्या नावानं साडी आणि कॉस्मॅटिक ब्रॅंड सुरु केलं आहे. अभिनय सोडून ती आता बिझनेसवूमन झाली आहे. रचना बॅनर्जीनं 2024 मध्ये लोकसभा निवडणूक लढण्यासाठई ती ममता बॅनर्जी यांच्या TMC पार्टीकडून उभी राहिली होती. त्यावेळी तिनं भाजपचे उमेदवार लॉकेट चॅटर्जी यांचा पराभव केला होता. 


रचना बॅनर्जीनं त्याच्या करिअरमध्ये 30 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. तिचं चित्रपटांमधील करिअर हे इतकं काही यशस्वी ठरलं नाही. रचना बॅनर्जीनं 1994 मध्ये 'मिस कोलकाता' सोबत पाच ब्यूटी पेजेंट जिंकली. आज ती लोकसभा खासदार आहे. दिग्दर्शक सुखेन दास यांच्या सल्ल्यानं तिनं तिचं नाव झुमझुम नाव बदलून रचना नाव केलं. 


हेही वाचा : 17 व्या वर्षी आई होताच इंडस्ट्रीला रामराम! लग्नानंतर 9 वर्षात पतीपासून विभक्त; आज करते सुपरहिट चित्रपट


रचनाच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचं झालं तर तिनं तिचा सह-कलाकार सिद्धांत मोहापात्राशी लग्न केलं. पण 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर प्रबल बसूशी तिनं 2007 मध्ये लग्न केलं पण 2016 मध्ये ते दोघे देखील विभक्त झाले. त्यांना एक मुलगा आहे.