मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची (Shahrukh Khan) पत्नी आणि इंटेरिअर डिझायनर गौरी खानचा (Gauri Khan) आज वाढदिवस आहे. बॉलिवूडचे हे पॉवर कपल जितके लोकप्रिय आहेत तितकीच रंजक त्यांची प्रेम कहाणी आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर शाहरुख आणि गौरीनं 1991 मध्ये लग्न केले. दोघांना तीन मुले आहेत. लग्नाच्या 30 वर्षांनंतरही दोघेही खूप आनंदी आहेत. गौरी आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. गौरीचा जन्म 8 ऑक्टोबर 1970 रोजी झाला. असे म्हटले जाते की, जेव्हा शाहरुखने गौरीला पाहिले तेव्हा गौरी अवघ्या 14 वर्षांची होती, पण तेव्हा शाहरुखमध्ये तिच्यासमोर प्रेम व्यक्त करण्याची हिंमत नव्हती.


आणखी वाचा : 'या' अभिनेत्रींनी ऑनस्क्रीन बाप - बेटा दोघांसोबत केला रोमान्स, यादीतील चौथ्या क्रमांकाचं नाव वाचून व्हाल आवाक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौरी 18 वर्षांची झाल्यावर दोघं रिलेशनशिपमध्ये आले, असे म्हटले जाते. रिपोर्टनुसार, गौरीच्या प्रेमात पडलेल्या शाहरुखनं तिच्याशी लग्न करण्याचे ठरवले होते. याच निर्णयादरम्यान गौरीच्या भावानेही शाहरुखला धमकी दिली होती. एवढेच नाही तर गौरीच्या भावाने बंदुक दाखवून दोघांना लग्न करण्यापासून रोखण्याची धमकी दिली होती.


आणखी वाचा : Kareena Kapoor ते Ranveer Singh पर्यंत 'हे' सेलिब्रिटी पार्टनरला पाहताच करतात Lip Lock


गौरी खान आणि शाहरुख खान एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीत भेटले. तेव्हापासून तो गौरीच्या प्रेमात होता. यानंतर दोघांमध्ये भेटीगाठी सुरू झाल्या. कुठल्या ना कुठल्या पार्टीत दोघे अधूनमधून भेटत असत. शाहरुख गौरीसाठी इतिहास विषयाचेच्या नोट्स बनवायचा असे म्हणतात.


आणखी वाचा : शाहरुखच्या घरातील मोठं सिक्रेट सर्वांसमोर; रितेश देशमुखच्या म्हणण्यावर विश्वास ठेवाल तर धक्काच बसेल


यानंतर दोघांच्या आयुष्यात एक क्षण आला, जेव्हा गौरीला शाहरुखपासून ब्रेक घ्यायचा होता. याचा खुलासा गौरीने तिच्या एका मुलाखतीदरम्यान केला होता. गौरीने सांगितले की, 'मला ब्रेक हवा होता, कारण शाहरुख खूप Possessive होता. त्यावेळी आम्ही खूप लहान होतो. आमच्या घरच्यांना याबद्दल काहीच माहिती नव्हती. आम्ही दोघंही अतिशय परंपरावादी कुटुंबातील होतो. (gauri khan birthday when her brother showed the gun to shahrukh khan not to marry) 


आणखी वाचा : 'मला एकदा तिनं इतकं मारलं की...', जया बच्चन यांच्या रागामुळे लेकिच्या मनात भलतीच दहशत


एवढेच नाही तर शाहरुख आणि गौरीने एकदा नव्हे तर तीनदा लग्न केले आहे. रिपोर्ट्सनुसार, शाहरुख आणि गौरीनं सगळ्यात आधी कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर निकाह केला आणि नंतर दोघांनीही हिंदू परंपरेनुसार लग्न केलं. दोघेही त्यांच्या तीन मुलांसह अबराम, सुहाना आणि आर्यन खानसोबत आनंदी आहेत. (Aryan, Suhana and Abram)