मुंबई - बॉलिवूड दिवा आलिया भट्ट नेहमीच तिच्या ट्रेंन्डी फॅशनमुळे चर्चेत असते. आता पुन्हा आलिया तिच्या तिने खरेदी केलेल्या चालत्या-फिरत्या घरामुळे चर्चेत आहे. आलियाने तिच्यासाठी ब्रॅन्ड न्यू वॅनिटी व्हॅन खरेदी केली आहे. विशेष म्हणजे ही वॅनिटी शाहरूख खानची पत्नी इंटेरिअर डिझायनर गौरी खानने डिझाइन केली आहे. आलियाने तिच्या नव्या कोऱ्या वॅनिटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौरी खानने वॅनिटीला एका लक्झरी घरासारखाच लुक दिला आहे. वॅनिटीमध्ये चमकदार वॉल आणि पेंटिंग्जही लावल्या आहेत. वॅनिटीतील मूड लाईटिंग अतिशय सुंदर दिसत आहे. फोटो अपलोड करत आलियाने कॅप्शनमध्ये गौरी खानला क्रेडिट दिलं आहे. 



 


 



आलियाने काही दिवसांपूर्वीच जुहूतील एका इमारतीत १३ करोडचं घर खरेदी केलं होतं. आलियाची या घराव्यतिरिक्त जुहूत आणखी दोन घरं आहेत. गौरी खानने रणबीर सिंह, सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन, जॅकलीन फर्नांडिस यांच्या घराचे इंटेरिअर केलं आहे. करण जौहरच्या घरातील टेरेसलाही गौरी खानने डिझाइन केलं आहे.