मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान (Shah Rukh Khan) ची पत्नी गौरी खान (Gauri Khan) चा आज 51 वा वाढदिवस. गौरी खान (Gauri Khan) चे असंख्य चाहते आहेत. गौरीची मुलगी सुहाना खानने तिला वाढदिवसाला खास शुभेच्छा दिल्या आहेत. सुहानाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून भावनिक पोस्ट लिहिली आहे. 


सुहानाने शेअर केली भावनिक पोस्ट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुहाना खान आणि गौरी खानचा एक जुना फोटो गौरीने आपल्या अकाऊंटवर शेअर केली आहे. थ्रोबॅक फोटोमध्ये खूप रोमान्स दिसत आहे.  ब्लॅक ऍण्ड व्हाईट फोटो शेअर करताना, सुहाना खान म्हणाली,'हॅप्पी बर्थ डे आई.' सुहानाच्या या पोस्टसोबत हार्ट इमोजी देखील आहे. सुहाना खानच्या या पोस्टवर अगदी मोजक्याच लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. ज्यांना सुहाना फॉलो करते. या पोस्टवर सुहानाने कॉमेंटचा बॉक्स बंद केला आहे. त्यामुळे चाहते कोणतीच कमेंट करू शकत नाही. 



भाऊ कोठडीत असताना सुहानाची भावनिक पोस्ट 


सुहाना खानचा भाऊ आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या ताब्यात आहे. आर्यन खानच्या अटकेनंतर सोशल मीडियावर सुहाना खानला ट्रोलही करण्यात आले आहे, त्यानंतर तिने कमेंट सेक्शन ब्लॉक केला आहे. गौरी खान आज तिचा वाढदिवस साजरा करेल का हा एक मोठा प्रश्न आहे कारण तिचा मुलगा तुरुंगात आहे.


आर्यन खान याला 8 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. त्याच्यासोबतच आणखी 8 जणांनीही एनसीबीच्या कोठडीत आणखी एक रात्र काढली. दरम्यान, आर्यनबाबतची सुनावणी सुरु असताना तिथं एका खास व्यक्तीचीही हजेरी होत. (Aryan khan drugs case)


ही व्यक्ती म्हणजे शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी. सूत्रांच्या माहितीनुसार सुनावणीदरम्यान, पूजा सतत रडत होती. तिच्या अश्रूंचा बांध फुटला होता. आर्यनची अवस्था तिला पाहावत नव्हती.