सलमान -कॅटरिनाच्या स्टाईलमध्ये हिंदी मालिकेतील ही जोडी अडकली लग्नबंधनात
सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी आहे.
मुंबई : सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी आहे.
यंदा तब्बल पाच वर्षानंतर सलमान आणि कॅटरिना रूपेरी पडद्यावर एकत्र दिसली. या जोडीला एकत्र पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी सिनेमागृहांमध्ये गर्दी केली होती. या चित्रपटाने 300 कोटींचा पल्ला पार केला आहे.
सामान्यांमध्ये जशी सलमान आणि कॅटरिना या जोडीची क्रेझ आहे तसीच ती अनेक कलाकारांचीही फेव्हरेट जोडी आहे. हिंदी मालिकांमधून घराघरात पोहचलेल्या गौतम रोडे आणि पंखुड़ी अवस्थी या जोडीवरही 'टायगर जिंदा है' आणि सलमान कॅटरिनाची जादू दिसली.
गौतम रोडे आणि पंखुड़ी अवस्थी अडकले लग्नबंधनात
गौतम रोडे आणि पंखुड़ी अवस्थी ही हिंदी मालिकांमधील जोडी नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. त्यांच्या लग्नसोहळ्यातील काही फोटो सोशलमीडियामध्ये रिलीज करण्यात आले आहेत. लग्नातील एका सोहळ्यामध्ये या दोघांनी 'टायगर जिंदा है' चित्रपटातील ' दिल दिया गल्ला'... या गाण्यातील कॅटरिना आणि सलमानप्रमाणे आपले ड्रेस डिझाईन केले आहेत. दोघांचा रोमॅन्टिक अंदाज पाहून अनेकांना सलमान कॅटरिनाची आठवण झाली.
हिंदी मालिकांमधून गौतम आणि पंखुडी आले रसिकांच्या भेटीला
रसिकांमध्ये गौतम रोडे आणि पंखुड़ी अवस्थी ही जोडी प्रसिद्ध आहे. 'सूर्यपुत्र कर्ण या मालिकेदरम्यान त्यांची ओळख झाली. गौतम सरस्वती चंद्र, नच बलिए आणि परिचय या मालिकेमधून तर 'अक्सर 2' या चित्रपटातून रसिकांच्या भेटीला आला होता. पंखुड़ी अवस्थी रझिया सुल्तान या मालिकेत रझिया सुल्तानच्या प्रमुख भूमिकेत झळकली होती.