Guatami Patil Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हि़डिओत काही व्हिडिओ हे खुप मनोरंजक असतात, तर काही व्हिडिओ हे धक्कादायक असतात. अशात आता एका लावणीचा व्हिडिओ खुप चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ गौतमी पाटीलच्या (Gautami Patil Lavni Video) लावणीचा आहे. तिच्या या व्हिडिओने इन्स्टाग्रामवर खुप धुमाकूळ घातला आहे. या सर्वांत अनेकांना प्रश्न पडलाय, ही गौतमी पाटील आहे तरी कोण? चला जाणून घेऊय़ात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्स्टाग्रामवर सध्या महाराष्ट्रातलं एकचं नाव चर्चेत आहे, हे नाव म्हणजे गौतमी पाटील(Gautami Patil). तिच्या लावणी डान्सने प्रेक्षकांना अक्षरश वेड केलं आहे. प्रेक्षक तिची लावणी पाहण्यासाठी तुफान गर्दी करतात. नुकत्याच तिच्या एका कार्यक्रमात मोठ्या गर्दीमुळे दुर्घटना देखील घडली होती. त्यामुळे ती वादात सापडली आहे. 


मोठा प्रेक्षकवर्ग 


गौतमी पाटीलच्या (Gautami Patil Lavani Dance)लावणीवरून मोठा वाद देखील झाला आहे. अनेकांनी तिच्या लावणी डान्सवर आक्षेप घेतला आहे. तिचा डान्स आणि हातवारे सगळं अश्लिल असल्याचे अनेकांनी म्हटलं आहे. तर असा एक प्रेक्षक वर्ग देखील आहे, जो तिची लावणी पाहण्यास खुप उत्सुक असतो. हा प्रेक्षक वर्ग खुपच मोठा आहे.त्यामुळेच तिचे राज्यातील अनेक ठिकाणी शो होत असतात. 



कोण आहे गौतमी पाटील?  


गौतमी पाटील (Gautami Patil Lavani Dance) ही मुळची कोल्हापुरची आहे. सध्या संपुर्ण महाराष्ट्रात तिची लावणी डान्सर म्हणूनच चर्चा आहे. गेल्या साधारण 4 ते 5 वर्षांपासून डान्स करत आहे. मात्र आता ती तिच्या लावणी डान्समुळे खुप चर्चेत आली आहे. 


लावणीवरून मोठा वाद 


गेल्या सप्टेंबरमध्ये गौतमी पाटील (Gautami Patil) चर्चेत आली होती. तिने एका शोमध्ये आक्षेपार्ह लावणी डान्स केला होता. या डान्सनंतर तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. तसेच ती वादात देखील सापडली होती. या व्हायरल व्हिडिओनंतर अनेकांनी तिला तिच्या अश्लील डान्समुळे ट्रोल करायला सुरुवात केली होती. तसेच अनेक मराठी Youtuber आणि Social Medis Influencers ने तिला रोस्ट करायला किंवा तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.


दरम्यान महाराष्ट्रात तिच्या (Gautami Patil) लावणी डान्सला विरोध झाला असला तरी अजूनही तिची क्रेझ कायम आहे. अनेक ठिकाणी तिचे लावणी डान्सचे कार्यक्रम होत आहेत. या कार्यक्रमाला तिच्या फॅन्सची प्रचंड गर्दी जमतेय.