`बापाला जाऊन 4 दिवस झाले नाहीत आणि...`, दहीहंडी कार्यक्रमात डान्स केल्यानं गौतमी पाटील ट्रोल
Gautami Patil Troll : गौतमी पाटील काल दही हंडी कार्यक्रमात डान्स करताना दिसली. अशात आता वडिल जाऊन 4 दिवस झाले नाही त्यात गौतमी या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसली त्यामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात येत आहे.
Gautami Patil Troll : लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील ही तिच्या डान्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. फक्त सोशल मीजियावर नाही तर ज्या कार्यक्रमात ती जाते त्या कार्यक्रमात तिला पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करताना दिसतात. तिच्या कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येनं गर्दी असते. काल दहीहंडीच्या निमित्तानं अनेक कार्यक्रमांमध्ये गौतमीनं हजेरी लावली होती. यावेळी गौतमीनं तिच्या डान्सनं सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र, दुसरीकडे असे काही नेटकरी आहेत ज्यांना गौतमीचं असे डान्स करणे पटलेलं नाही. अनेकांनी वडिलांच्या निधनानंतर लगेच एका कार्यक्रमात हजेरी लावत डान्स केल्यामुळे तिला ट्रोल केले आहे. तिच्या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत तिला ट्रोल केले आहे.
गौतमीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर अनेकांना वाटले होते की तिला दहीहंडीनिमित्तानं मिळालेल्या सगळ्या सुपाऱ्या ती रद्द करेल. मात्र, तिनं असं न करता थेट कार्यक्रमात हजेरी लावली आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तर दुसरीकडे गौतमीच्या चाहत्यांनी तिची बाजू घेत शेवटच्या क्षणी कोणतीही सुपारी रद्द करता येत नाही असं म्हणतं तिची बाजू घेतली आहे.
सोशल मीडियावर कमेंट करत नेटकऱ्यांनी गौतमीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की 'वडील वारले तिकडे दशक्रियेला पण जाऊन नाच म्हणावा नाची सा.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'चार दिवस झाले नाही बाप मेला... आणि या ताई साहेब नाचायला लागल्या... त्याच दिवशी कॉमेंटमध्ये मी भविष्यवाणी केली होती... आज जरी हीचा बाप मेला तरी पण हिने एखाद्या दही हंडीची सुपारी घेतलेली असेल... आणि बघा...' तिसरा नेटकरी म्हणाला, 'फालतू हिच्यावर पैसे खर्च करण्याच पेक्षा कृष्ण जंयतीला किती तरी गबीर कृष्ण उपाशी झोपत असतील तिथे काही मदत केली असती तर खरोखर देवाला पण आनंद झाला असता किंवा काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचा होता ना... गौतमी तर आहेच... पण त्याहून...'
हेही वाचा : शाहरुख खानचा Jawan एक नाही तर 4 चित्रपटांची कॉपी? दिग्दर्शकावर आरोप
दुसरीकडे गौतमीला ट्रोल करणाऱ्यांना तिच्या चाहत्यांनी खडेबोल सुनावले आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की 'बाप मरून 4 दिवस झाले... मग 12 दिवस घरात बसून बाप परत येणार आहे का... बाप मेला असताना सचिन तेंजुलकर क्रिकेट खेळू शकतो... त्याच मात्र, कौतुक केलं जातं... पण एक स्त्री नाचू शकत नाही... तीच काम ती करू शकत नाही... बाप मेला याचं दु: ख सगळ्यांना असतं... तिलाही असेल... पण ही कलाकारांची जात आहे एवढंच...!' अशा अनेक कमेंट करत गौतमीच्या चाहत्यांनी तिला पाठिंबा दिला आहे.