Gautami Patil Video : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. गौतमी पाटील (Gautami Patil) हिने अक्षरक्ष: महाराष्ट्रातील तरुणाईला भुरळ घातली आहे. सबसे कातील (Sabse Katil Gautami Patil ) असं म्हटलं तर अनेकांच्या तोंडातून गौतमी पाटील असेच शब्द बाहेर पडतात. त्यामुळे गौतमी पाटील आणि तिचे डान्स गेल्या काही महिन्यांपासून सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. गौतमीचा नृत्याचा कार्यक्रम झाला आणि तिथे गोंधळ, राडा झाला नाही असं होत नाही. गौतमीचा कार्यक्रम कुठेही असला तरी गर्दीच होतेच. मात्र गौतमी आता एका वेगळ्याच कार्यक्रमामुळे चर्चेत आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नगरच्या कोळपेवाडीत श्री महेश्वर फेस्टिव्हलमध्ये गौतमी पाटीलचा डान्स ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात हजारो तरुण जमले होत. जिथे नजर पडेल तिथे पब्लिक दिसत होती. गौतमीचा डान्स सुरू होताच एक कल्ला  झाला. गोंगाट सुरू झाला. शिट्ट्यांता पाऊस पडला.  गौतमीच्या अदा, ठेका आणि नजाकत पाहून तरुणाईंनेही उभ्या जागी ठेका धराला. हिचा डान्स पाहून तरुणच नव्हे तर महिलाही मोठ्या संख्येने गौतमीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. 



गौतमीतचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा पब्लिकने एकच गर्दी केली.  पाटलांचा बैलगाडा त्याने घाटात केलाय राडा... आणि मला म्हणत्यात पुण्याची मैना... या गाण्यावर जवळजवळ जमलेल्या सर्वांनीच ठेका धरला. लोकांना या कार्यक्रमात बसालया जागा नव्हती. या लोकांना बसवता बसवता पोलिसांची दमछाक उडाली. पोलिसांनी या तरुणांना लाठी मारत खाली बसवले.


वाचा: ‘या’ ग्राहकांसाठी LPG सिलेंडर होणार 200 रुपयांनी स्वस्त 


हा कार्यक्रम झाल्यावर गौतमी पाटीलने पब्लिकशी संवाद साधला.. यावेळी ती म्हणाली, नमस्कार कसे आहेत सगळे? लवू यू...  लव यू... आज मी आभार मानते... कोळपेवाडीकारांना आज बोलावलं आणि कार्यक्रम ठेवला तुमचे मनापासून आभार मानते. सर्वांनी व्यवस्थित घरी जा. राडा करू नका, असं गौतमी पाटील म्हणाली...            


गौतमी पाटील हिची सध्या सोशल मीडियावर मोठी क्रेझ आहे.  जिथे गौतमी पाटील हिचा कार्यक्रम असतो तिथे तरुण पोहचत असतात. त्यात काही जण गौतमीच्या समोर डान्स करतात त्यामुळे ठिकठिकाणी राडा झाल्याचे पाहायला मिळाले असून नगरमध्ये देखील तोच अनुभव पोलिसांना आला.