मुंबई : विख्यात गझलकार इलाही जमादार यांचं वृद्धापकाळानं निधन (Gazalkar Illahi Jamadar) झालं आहे. सांगलीजवळच्या दूधगावात वृद्धापकाळाने निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इलाही जमादार आजाराने त्रस्त होते. त्याच्या जाण्याने गझल विश्वात शोककळा पसरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इलाही जमादार यांचा जन्म १ मार्च १९४६ साली सांगतीलीत दुधगावात झाला. लोकप्रिय दिग्गज गझलकार सुरेश भटांच्या नंतर इलाही जमादार यांच्या नावाचा उल्लेख होत असे. इलाही जमादार यांनी १९६४ सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी आहेत. विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाहींच्या कविता व गझला प्रसिद्ध झाल्या आहेत. ते गझल क्लिनिक ही नवोदित मराठी कवींसाठी गझल कार्यशाळा घ्यायचे. वयाच्या ७५ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं आहे. 


इलाही जमादार यांनी अनेक कविसंमेलने व मुशायरे यात भाग घेतला आहे. इलाही जमादार यांचे महाराष्ट्रतील अनेक शहरांत आणि व महाराष्ट्राबाहरील इंदूरमध्ये स्वतंत्र काव्यवाचनाचे व मराठी ग़ज़लांच्या संदर्भातील प्रश्नोत्तरांचे जाहीर कार्यक्रम करायचे. इलाही यांनी 'जखमा अशा सुगंधी' आणि 'महफिल-ए-इलाही' या नावांचे मराठी, उर्दू काव्यवाचनाचे जाहीर कर्यक्रम केले आहेत.



  


इलाही जमादार यांची गीते


मराठी - एक जखम सुगंधी, शब्दसुरांची भावयात्रा, स्वप्न तारकांचे, भावनांची वादळे (गझला व निवेदन) तसेच हिंदी अलबम -हिंदी पॉप गीते प्रसिद्ध आहेत. 
संगीतिका - हिंदी - सप्तस्वर, माया और साया, नीर क्षीर विवेक. मराठी - स्वप्न मिनीचे
नृत्यनाट्ये : हिंदी - नीरक्षीरविवेक
मराठी - मी कळी मला फुलायचे.  जखमा अशा सुगंधी , भावनांची वादळे , दोहे इलाहीचे, मुक्तक आदी इलाही जमादार यांचे काव्य/गझल संग्रह.... अनुराग, अनुष्का, अभिसारिका, गुफगू आणि मुक्तक .