राखी सावंतने विदेशी रेसलरचा मार खाल्ल्यावर गिता-बबीता म्हणतात...
तनुश्री प्रकरणात तर शाब्दीक चकमक होती पण इथे तर राखीनं आपटून आपटून मार खाल्लाय म्हणजे विषय थोडा गंभीर आहे.
मुंबई : पंचकूलाच्या कॉंटिनेंटल रेसलिंग एंटरटेंमेंट (सीडब्ल्यूई)फाइटमध्ये राखी सावंतला एका विदेशी रेसलरने आपटून आपटून मारलं होतं. यामुळे राखीचं कंबरडं मोडल, हाड खिळखिळी झाली. सध्या ती 'बेड रेस्ट' करतेय. त्यानंतर भारताचा पेहलवान 'द ग्रेट खली'ने राखीची भेट घेऊन विचारपूस केली होती. या प्रकरणाची देशभरात चांगलीच चर्चा होतेयं. कोणी राखी सावंतच्या वाटेला गेल्यावर ती काय करू शकते हे आपण तनुश्री दत्ता प्रकरणात पाहिलं असेलं. राखीने तनुश्रीवरच गंभीर आरोप करुन वादाला नवं वळण दिलं. तनुश्री प्रकरणात तर शाब्दीक चकमक होती पण इथे तर राखीनं आपटून आपटून मार खाल्लाय म्हणजे राखीसाठी विषय थोडा गंभीर आहे.
'द ग्रेट खली'ने राखीच्या कानात काय सांगितलं हे अजून कळलं नसलं तरी राखी काय शांत बसणाऱ्यातली नाहीय.
काय आहे प्रकरण ?
पंचकूलाच्या ताऊ देवी लाल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सीडब्ल्यूईच्या बॅनरखाली आयोजन करण्यात आलं होतं. अंबाला शहरात कुस्तीची स्पर्धा होती. इथे देशविदेशातून स्पर्धक आले होते. या इव्हेंटचं प्रमोशन राखी सावंत आणि अर्शी खानने केलं. रविवार (11 नोव्हेंबर) एक मोठी फाइट झाली होती.
या इव्हेंटमध्ये पुरूष रेसलेरांसोबत महिला रेसलर्सही स्पर्धेत होत्या. अशाच एका स्पर्धेत एका विदेशी महिला रेसलरने खुलं आव्हान दिलं.
'जर कोणत्या भारतीय महिला रेसलरमध्ये दम असेल तर माझ्याशी फाइट करावी', असं ती म्हणाली. आता तिथे जमलेल्यांपैकी जे लोक फाइट करतात त्यांनी हे मनावर नाही घेतलं पण राखीला राग अनावर झाला.
हे ऐकताच राखी सावंत डान्स करत रिंगमध्ये पोहोचली आणि त्या रेसलर चॅलेंज केलं की 'माझ्या सारखा डान्स करून दाखवं असं म्हणत तिला चिडवू लागली. 'यावर चिडलेल्या रेसलरने राखीने आपटून आपटून मारलं.
फोगट बहिणींची प्रतिक्रिया
आता या सर्व प्रकरणवर गिता आणि बबीता या फोगट बहिणींना त्यांची प्रतिक्रिया विचारली जातेय. राखी सावंतने मार खाल्ल्याचा बदला तुम्ही घेणार का ? असं विचारलं जातंय. पण फोगट बहिणींनी सावध पवित्रा घेतलायं. 'आमचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, राखीला बदला घ्यायचाय तर ती स्वत: घेऊ शकते', असं फोगट बहिणींनी म्हटलंय.
त्यांनी बहुदा राखी सावंत नाव इंटरनेटवर सर्च केलं असावं. त्यात त्यांना राखीच्या आधीच्या फाईटही दिसल्या असाव्यात.
राखी स्वत: बदला घेऊ शकते हे देखील त्यांना यातून कळालं असावं. अशा प्रकारच्या फाईटसाठी जास्त ताकतीची गरज नसते त्यामुळे राखी जिंकू शकते असे होप्सही त्यांनी राखीला दिले आहेत. सीडब्ल्यूई रिंगमध्ये खेळणारा कोणताही खेळाडू कुस्ती खेळणाऱ्यांसमोर टिकू शकत नाही असंही त्या म्हणाल्या.
आता राखी सावंत धडधाकट झाल्यावर या सर्वाचा कसा सामना करते हे पाहण म्हणजे आणखी मनोरंजन असणार आहे.