मुंबई : डान्स कोरिओग्राफर गीता कपूर (Geeta Kapoor) यांचे काही फोटो गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत. या फोटोत गीता कपूर यांच्या कपाळात सिंदूर भरलं आहे. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे. गीता कपूर यांनी गुपचूप लग्न केलं. मात्र गीता या सगळ्या चर्चांवर भडकली असून तिने सडेतोड उत्तर दिलं आहे. 


गीता कपूरने दिलं हे उत्तर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गीता कपूरने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 'मी अजून लग्न केलं नाही. तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहित आहे की, जर मी लग्न केलं असतं तर ही आनंदाची गोष्ट लपवली नसती. दुसरी गोष्ट म्हणजे, मी आता लग्न कशी करू शकते. मी काही महिन्यांपूर्वीच आईला गमावलं आहे. त्यामुळे मी आता या कोणत्याच मनस्थितीत नाही.'


या फोटोमुळे झाली चर्चा 



गीता कपूरचे चाहते गीता माँ म्हणून त्यांना संबोधतात. अनेक डान्स रिऍलिटी शोमध्ये त्यांनी परिक्षकाची भूमिका बजावली आहे. गीता कपूर सोशल मीडियावर फार ऍक्टिव नाहीत. मात्र त्यांच्या सिंदूर लावलेल्या फोटोमुळे त्या खूप चर्चेत आल्या. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांना प्रश्न पडला की, गीता कपूर यांचं लग्न झालं का? 


गीता यांच्या सडेतोड उत्तराने चर्चांना पूर्णविराम 


लाल रंगाच्या ड्रेसमध्ये गीता कपूर दिसत आहे. गीता यांनी कपाळाला सिंदूर लावल्यामुळे चर्चांना उधाण आलं. कामाबद्दल बोलायचं झालं तर गीता गेल्या काही दिवसांपासून रिऍलिटी शो सुपर डान्सर 4 मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे. गीता या शोमध्ये खूप लोकप्रिय आहे.