मुंबई : बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपले पक्के बस्तान बसवून मराठी चित्रपटसृष्टीतही पदार्पणात धमाका करणारा मराठमोळा 'लै भारी' अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. त्याने या आगोदर बॉलिवूडमध्येही दमदार सिनेमे दिले आहेत. त्यानंतर त्याने 'लै भारी' सिनेमाच्या माध्यमातून मराठीतही पाऊल ठेवले. या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या यशाच्या जोरावर रितेश पुन्हा एकदा नवा सिनेमा घेऊन मराठी प्रेक्षकांसमोर येत आहे. 'माऊली', असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमाचे शुटींगही सुरू झाल्याची माहिती रितेशने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.


एक नवा प्रवास सुरू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रितेश आणि जेनिलिया देशमुख यांच्या मुंबई फिल्म कंपनीचे प्रॉडक्शन असलेल्या या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा आदित्य सरपोतदार यांच्या खांद्यावर असणार आहे. या चित्रपटाच्या शुटींगची माहिती देताना रितेशने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'A new journey begins... ‘माऊली'.क्षितिज पटवर्धन यांनी 'माऊली' चित्रपटाची कथा लिहिली आहे.


माहितीला हॅशटॅगची जोड


दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोदार यांनीही सिनेमाच्या शुटींगला सुरूवात झाल्याची माहिती समाजमाध्यमांवरून (सोशल मीडिया) दिली. ही माहिती देताना ते म्हणतात,  "The BIG ANNOUNCEMENT is here. My next film titled 'MAULI' starting Riteish Deshmukh and Produced by Mumbai Film Company goes on floor. Written by Kshitij Patwardhan and DOP Amalendu Chaudhary..." समाजमाध्यमांवर या सिनेमाची चर्चा व्हावी यासाठी त्यांनी #Mauli #Shootbegins #Marathifilm हे हॅशटॅगही त्यांनी दिले आहेत.



दरम्यान, रितेश देशमुख हा या चित्रपटातील प्रमुख चेहरा असल्याचे स्पष्ट झाले असले तरी, या चित्रपटात आणखी कोणकोणते चेहरे झळकणार याबाबतची माहिती गुलदस्त्यातच आहे. या वर्षाखेरीस हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.