मुंबई : अभिनेत्री जिनिलीया देशमुख सतत तिच्या सोशल मीडियावर सक्रिय असते. नेहमीच ती पती रितेश सोबत कॉमेडी व्हिडिओ शेअर करत असते. चाहतेही तिच्या व्हिडिओवर नेहमीच प्रेमाचा वर्षाव करत असतात. जिनिलीयाचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. अभिनेत्रीने लग्नानंतर चित्रपटसृष्टीत ब्रेक घेतला होता. मात्र त्यानंतर डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'वेड' सिनेमातून तिने सिनेसृष्टीत पुनरागमन केलं. रितेश-जिनिलीयाच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर तिने चित्रपट सृष्टीतून ब्रेक घेतल्यावर अनेका अनेक चर्चा रंगताना दिसल्या होत्या. मात्र त्यावेळी तिने त्याविषयी काही बोलणं टाळलं होतं. आता जिनिलीयाने यावर उत्तर दिलं आहे. नुकतीच जिनिलीया आणि रितेशने करिना कपूरच्या 'व्हॉट वुमन वॉन्ट'मध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये तिने अनेक प्रश्नांची उत्तर दिली आहेत. यावेळी तिने सिनेसृष्टीतून ब्रेक का घेतला होता यांवरही खुलासा केला आहे.


रितेश आणि जिनिलीयाने मनमोकळपणाने त्यांच्या नात्याविषयी खुलासा केला आहे. लग्नानंतर रितेशने जिनिलीयाला चित्रपटसृष्टी सोडायला भाग पाडलं. असं बोललं जात होतं. यावर आता उत्तर देत जिनिलीया म्हणाली, ''लग्न झाल्यानंतर मला लग्नाला प्राधान्य द्यायचं होतं. लग्नाआधी मी हिंदी, तेलुगू, तमिळ सिनेसृष्टीत खूप काम करत होते. लग्नानंतर काम थांबवणं हा पूर्णपणे माझा निर्णय होता. लग्नानंतर जेव्हा मी चित्रपटांमधून ब्रेक घेतला तेव्हा लोकांनी मला विविध प्रश्न विचारले. रितेशचे वडील राजकारणात असल्याने देशमुख कुटुंबीयांनी माझी फिल्मी कारकीर्द संपवली, असं अनेकांनी गृहीत धरलं. पण तसं काहीचं नव्हतं.


 याचबरोबर लोकं त्यावेळेस असंही विचारत होते की,  तुझं चित्रपटांमध्ये काम करण रितेशने थांबवलं का?  तेव्हा प्रत्येकवेळी मला सगळे एकच उत्तर द्यायचे की, नाही. मलाच दीर्घकाळ मनोरंजन सृष्टीपासून ब्रेक घ्यायचा आहे.''


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


याचबरोबर रितेश यावरं म्हणाला की, ''कामातून ब्रेक घेणं हा सर्वस्वी तिचा निर्णय होता. तिला यापूर्वीच पुन्हा एकदा सिनेसृष्टीत पदार्पण करायचं होतं पण करोनामुळे ते लांबलं. मी तिला अनेकदा सांगायचो की तुझं कॅमेऱ्यासमोर असणं तू मिस करत आहेस त्यामुळे तू काम करायला सुरुवात कर.'' जिनिलीया आणि रितेशचं हे वक्तव्य सध्या खूप चर्चेत आहे. जिनिलीया बऱ्याच वर्षांनंतर वेड या सिनेमात झळकली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं सर्व स्तरावरुन कौतुकही झालं. या आधी जिनिलीयाने दक्षिणात्य, हिंदी सिनेमात काम केलं आहे.