मुंबई : जेनेलिया डिसूझा अनेकदा तिचा पती रितेश देशमुखसोबतचे मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. पण यावेळी तिने शेअर केलेला व्हिडिओ तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. खरंतर, जेनेलियाने वर्कआउट व्हिडिओ  शेअर करून तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे. तर जेनेलियाने सहा आठवड्यात चार किलो वजन कसं कमी केलं याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्कआउटचा व्हिडिओ शेअर करत जेनेलियाने एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने तिचा अनुभव शेअर केला आहे. आता ती पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वास अनुभवत असल्याचंही म्हटलं जात आहे.


जॉन अब्राहमनेही पती रितेशला मदत केली
जर तुम्ही जेनेलियाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर गेलात तर तुम्हाला तिच्या फिटनेसशी संबंधित अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील. पण ताज्या व्हिडिओच्या माध्यमातून तिने वजन कमी करण्याचा संपूर्ण प्रवास एकत्र दाखवला आहे.  व्हिडिओमध्ये, जेनेलिया जिम इन्स्ट्रक्टरसोबत कठोर प्रशिक्षण घेताना दिसत आहे. ती रितेश आणि जॉन अब्राहमसोबतही दिसत आहे. जे तिला वर्कआउटमध्ये मदत करताना दिसत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


जेनेलियाने सहा आठवड्यात 4 किलो वजन कमी केलं
जेनेलियाने तिच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे की, जेव्हा तिने वजन कमी करण्याचा प्रवास सुरू केला तेव्हा तिचं वजन 59.4 किलो होतं. सहा आठवड्यांच्या वर्काऊटनंतर आता तिचं वजन ५५.१ किलो आहे. तिने लिहिलं आहे की, "सहा आठवडे उलटले आणि 59.4 किलो ते 55.1 किलोपर्यंतचा प्रवास खूप छान होता. मी अनेक शंका आणि असुरक्षिततेने सुरुवात केली.


पण आज माझं उद्दिष्ट साध्य करण्याव्यतिरिक्त, मला एक व्यक्ती म्हणून अधिक आत्मविश्वास, शिस्तबद्ध आणि संरचित वाटत आहे. मला फिटनेस हा माझ्या आयुष्याचा एक भाग बनवायचा आहे.