मुंबई : बॉलिवूड स्टार्स आज रंगांचा सण साजरा करतायत. बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी होळी खेळतानाचे फोटे सोशल मीडियात शेअर केलेयत. दरम्यान, बॉलिवूड स्टार रितेश देशमुख (Riteish Deshmukh)आणि जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh)यांचा एक गोड व्हिडिओही चर्चेत आहे. जेनेलिया आणि रितेशने एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आणि चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या खूप पसंतीस पडतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेनेलिया आणि रितेशचा एक रोमँटिक व्हिडिओ समोर (Genelia And Riteish Video) आला आहे. यामध्ये ते दोघेही रंगात रंगलेले दिसत आहेत. यात जेनेलिया रितेशवर फुले फेकत आहे. प्रथम जेनेलियाने रितेशवर रंग फेकून त्याला त्रास दिला आणि त्यानंतर रितेशने जेनेलियाच्या चेहऱ्यावर जबरदस्ती रंग लावला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)


व्हिडिओ शेअर करताना जेनेलियाने म्हटले की, 'कोविडची बंदी पाहता उत्सव स्वत: च्या मार्गाने खास बनवा. लहान आणि मर्यादित असला तरी उत्सवाची भावना महत्वाची आहे. होळीच्या शुभेच्छा.



सिनेमांपासून दूर 


जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) व्हिडिओवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. रितेश आणि जेनेलियाने 2003 मध्ये 'तुझे मेरी कसम' चित्रपटाद्वारे एकत्र पदार्पण केले होते. तेव्हापासून दोघेही एकमेकांना डेट करायचे. २०१२ मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले. 


रितेश आणि जेनेलियाला रियान आणि राहिल ही दोन मुले आहेत. जेनेलिया देशमुख सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असून बर्‍याचदा तिचे फोटो शेअर करत असते. लग्नापासून ती चित्रपटांपासून दूर गेली आहे.