बई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)मालिकेतील ज्येष्ठ कलाकार नट्टू काका म्हणजे घनश्याम नायक (Ghanshyam Nayak) यांचं निधन झालं. नट्टू काका गेल्या अनेक दिवसांपासून कॅन्सरशी लढा देत होते. अखेर रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे दोन ऑपरेशन देखील झाले आहेत. वयाच्या 77 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आज अंत्यदर्शन घेण्यात आलं. यावेळी ही क्षणचित्रे. नट्टू काकांच अंत्यदर्शन घेण्यासाठी "तारक मेहता'मधील अनेक कलाकार उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शोचे कलाकार नट्टू काकांना म्हणजेच घनश्याम नायक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले. आता त्याची चित्रे समोर येत आहेत. त्यांचे अंतिम संस्कार कांदिवली पश्चिम येथे घेण्यात आले आहेत.



जरी घनश्याम नायक यांना या शोमधून सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. परंतु 1960 मध्ये 'मासूम' चित्रपटात ते बालकलाकार म्हणून दिसले. ते सलमान खानच्या 'दिल दे चुके सनम' या चित्रपटातही दिसला होता.



जेठालाल अर्थात दिलीप जोशीही घनश्याम नायक यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचले. त्यांनी नट्टू काकांना श्रद्धांजली वाहिली. तसेच ते सर्व व्यवस्था सांभाळतानाही दिसले.



तारक मेहतामध्ये बागाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वकारिया याने देखील अंत्यदर्शन घेतलं. नट्टू काका त्याच्या काकांची भूमिका साकारत होते. 



तारक मेहता का उल्टा चष्मा मधील गोगी आणि टप्पू म्हणजे समय शाह आणि भव्य गांधी देखील नट्टू काकांना आदरांजली वाहण्यासाठी पोहोचले. 



बबीता जी अर्थात 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ची मुनमुन दत्ता देखील यावेळी दिसली. घनश्याम नायक यांच्या शेवटच्या दर्शनासाठीही ती पोहोचली होती.