मुंबई : तत्कालीन शिक्षण पद्धतीवर भाष्य करणारा 'घुमा' हा मराठी सिनेमा लवकरच पडद्यावर येणार आहे. या सिनेमाचं पोस्टर आज रिलीज करण्यात आलं. या सिनेमाची कथा अतिशय रंजक असल्याची चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 ग्रामीण शिक्षण व्यवस्थेचे सध्या काय हाल आहेत, त्यातल्या त्यात मराठी आणि इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणारी लहान मुलं कशी कचाट्यात सापडली आहेत, याचं वास्तववादी चित्रण या सिनेमात मांडण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.


विषय शिक्षणाचा असला तरी अधिक रंजक पद्धतीने मांडल्याने, ग्रामीण भागातील विविध व्यक्तिरेखा आणि सध्याची गंमतशीर परिस्थिती महाराष्ट्र्समोर येणार आहे, विशेष म्हणजे दिग्दर्शक, तसेच सहाय्यक दिग्दर्शक आणि लेखक मंडळी ही ग्रामीण भागातील असल्याने, सिनेमात सर्वच नवनवीन आणि पाहावंस वाटणारं असणार आहे.