COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : ग्रामीण भागात इंग्लिश माध्यमातील शाळांचा पेव फुटला आहे, ज्यांच्याकडे ४ पैसे आहेत जे थोडेफार कर्जकरून इंग्रजी माध्यमात शिक्षण घेण्याचा हट्ट धरतात, इंग्रजी शाळेत शिकण्याच्या फॅशनला बळी पडतात. 


यानंतर याचे मोठे दुष्परीणाम देखील दिसून येतात, अशामुळे नेमकी काय परिस्थिती निर्माण होते, याचं वास्तव 'घुमा' या मराठी सिनेमात असल्याचं सांगण्यात येत आहे. 


मराठी आणि इंग्रजी माध्यमातील शिक्षणाची चिकित्सा या सिनेमात केल्याचं सांगण्यात येतं, मात्र वास्तवातला हा सिनेमा अधिक रंगतदार आणि मजेदार असल्याचंही सांगण्यात येत आहे.  'घुमा' हा सिनेमा ६ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.