नवी दिल्ली : पंजाबी सिनेमा लॉन्ग लाचीचे पहिले गाणे आणि टायटल ट्रॅक रिलीज झाले. रिलीज झाल्यावर लगेचच या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. या गाण्याचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहेत. यातच एक या गाण्यावरील एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या पंजाबी गाण्यावर अभिनेत्री नीरु बाजवा आणि अंबरदीप सिंग प्रमुख भुमिकेत आहेत. यात अभिनेत्री नीरु बाजवाने सुंदररीत्या डान्स केला आहे.


जबरदस्‍त ट्रेंड 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे गाणे ९ मार्चला प्रदर्शित झाले. या गाण्यावरील मनप्रीत टूरचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्‍त ट्रेंड होत आहे. यात ती आपल्या दोन मैत्रिणींसोबत डान्स करत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्याला १८ लाख व्हीव्यूज मिळाले. तुम्हीही पहा हा व्हिडिओ...



या गायिकेने गायले हे गाणे


लॉन्ग लाचीचे हे टायटल ट्रॅकमध्ये गायिका मन्नत नूरने गायले आहे. तर संगीत गुरमीत सिंगने दिले आहे.