नवी दिल्ली : अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या 'बागी' सिनेमातील 'छम छम छम' गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता याच गाण्यावर दोन मुलींनी केलेल्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बागी' सिनेमा गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात रिलीज झाला होता आणि रिलीज होण्यापूर्वीच या सिनेमातील गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली होती. इतकेच नाही तर या सिनेमातील गाण्यांची क्रेझ इतकी होती की तरुण या गाण्यावर डान्स करत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात अपलोड करत आहेत.


सध्या इंटरनेटवर 'छम छम छम' या गाण्यावर डान्स केल्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन मुली डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ Aashma Dhakal नावाच्या एका युट्यूब चॅनले अपलोड केला आहे. या व्हिडिओत दोन तरुणी मैदानात डान्स करताना दिसत आहेत.



५ लाखांहून अधिक वेळा पाहिला हा व्हिडिओ


हा व्हिडिओ आतापर्यंत ५१२८७०२ वेळा पाहीला आहे आणि अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. या व्हिडिओतील मुलींनी 'छम छम छम' या गाण्यावर श्रद्धा कपूरने केलेल्या डान्स स्टेप्स विविध अँगले केल्या आहेत. त्यामुळेच हा व्हिडिओ अनेकांना आवडत आहे.