मुंबई : सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या टायगर जिंदा है मधील स्वैग से स्वागत हे गाणे प्रदर्शनानंतर सुपरहिट झाले. त्यातील सलमानचा अंदाज किंवा गाण्यातील त्याचा डान्स सर्वांनाच भावला. अनेक फॅन्स त्याचा हा जबरदस्‍त अंदाज कॉपी करताना दिसत आहेत. पण सलमानच्या वेस्टर्न बीटवरील या गाण्यावरचा बेली डान्स तुम्ही कदाचित पाहिला नसेल. सलमानच्या या गाण्यावर मुलींच्या ग्रुपने जबरदस्‍त डान्स केला आहे. 
त्याचबरोबर कतरिना आणि सैफ अली खानच्या फॅंटम सिनेमातील प्रसिद्ध गाणे अफगान जलेबीवर देखील या मुलींनी धमाकेदार डान्स केला आहे.


गाण्याचे अरेबिक व्हर्जन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी युट्यूबवर शेअर करण्यात आला. त्यानंतर याला सुमारे ३ लाखांहुन अधिक व्हुज मिळाले. हा व्हिडिओ बेली डान्सचे प्रसिद्ध बंजारा स्कूल ऑफ डान्सद्वारे सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. हा ग्रुप बेली डान्ससाठी अतिशय प्रसिद्ध आहे. या व्हिडिओत या मुली या गाण्याच्या अरेबिक व्हर्जनवर नाचताना दिसत आहेत.


व्हिडिओ


स्वैग से स्वागतचे अरेबिक व्हर्जन सोशल मीडियावर येताच सुपरहिट झाले. युट्यूबवर अपलोड केल्यानंतर २४ तासात या गाण्याला लाखो व्हुज मिळाले. तुम्हीही पहा हा जबरदस्‍त डान्स व्हिडिओ...



सिनेमा डिसेंबरमध्ये प्रदर्शित


सलमान कतरिनाचे हे गाणे २१ नोव्हेंबरला प्रदर्शित करण्यात आले होते. तर सिनेमा डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला.