तरूणींच्या बॉलिवूडचा डान्सचा यूट्यूबवर धुमाकूळ
यावर्षी रिलीज झालेल्या वरूण धवनच्या ‘जुडवा २’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धमाल केली. या सिनेमातील गाणीही चांगलीच गाजली.
नवी दिल्ली : यावर्षी रिलीज झालेल्या वरूण धवनच्या ‘जुडवा २’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धमाल केली. या सिनेमातील गाणीही चांगलीच गाजली.
‘ऊंची है बिल्डींग’ या गाण्याची लोकप्रियता अधिक बघायला मिळाली. सध्या यूट्यूबवर याच गाण्यावरील एक डान्स व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. यात काही मुलींना धमाकेदार डान्स केला असून त्यांच्या डान्सला पसंती मिळत आहे.
हा व्हिडिओ Shreekant dance ahire नावाच्या यूट्यूब चॅनलने अपलोड केलाय. हा व्हिडिओ २८ सप्टेंबरला अपलोड करण्यात आलाय. आणि दोन महिन्यात या व्हिडिओला एक लाखांपेक्षा जास्त प्रेक्षकांनी पाहिले आहे. यातील तरूणींनी आपल्या डान्सने सर्वांनाच चकीत केले आहे त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.