मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून करिष्मा कपूर सिनेमांपासून लांब असली तरी तिच्याबद्दल चर्चा मात्र आजही होत आहे. कधी फोटोंमुळे तर कधी अन्य कारणांमुळे करिश्मा चर्चेचा विषय ठरते. आता करिष्मा रुपेरी पडद्यावर नाही तर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. एकेकाळी यशाच्या शिखरावर असलेली करिष्मा घटस्फोटामुळे चर्चेत आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या करिष्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये गोविंदाने फार पूर्वी केलेल्या भविष्यवाणीबद्दल तिने सांगितलं आहे. करिष्मा म्हणाली, 'मी चीची जी  (गोविंदा)  यांची फार मोठी चाहती आहे. जेव्हा 'खुदगर्ज' सिनेमा प्रदर्शित झाला होता. मला 'आपके आ जाने से' गाणं मला फार आवडत होतं. तेव्हा मी आई-वडिलांसोबत गोविंदा यांना भेटायला गेली. होती...'



'तेव्ही चीचींनी मला विचारलं की, तुला अभिनेत्री व्हायचं आहे का? मी हो म्हणाली... त्यानंतर ते म्हणाले एक दिवस तू मोठी अभिनेत्री होशील... तेव्हा त्यांनी मला आशीर्वाद दिले...' पण करिष्माची खासगी आयुष्य मात्र कायम चर्चेत राहिलं. 


आता करिष्माबद्दल सांगायचं झालं तर, ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे असंख्य फॉलोअर्स देखील आहेत. एवढंच नाही, तर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.