SSR Case : सुशांत आत्महत्यचं ड्रग्स प्रकरणी `गोवा कनेक्शन`
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी रोज नवीन खुलासे समोर येत आहेत.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणी तपासणी सुरू आहे. मात्र अद्यापही सुशांतच्या आत्महत्ये मगील कोणताही ठोस पुरावा हाती लागला नाही. सध्या एनसीबी या प्रकरणी ड्रग्स ऍगलवर तपासणी करत आहे. यामुळे झगमगत्या दुनियेमागील काळ वास्तव समोर येत आहे. याप्रकरणी अनेकांची नावे देखील समोर आली आहेत.
शनिवारी ताब्यात घेण्यात आलेल्या कमरजीत यानी म्हणजेच KJची चौकशी करण्यात आली. कमरजीच्या करण्यात आलेल्या चौकशीच्या माध्यमातून कमरजीत हा दीपेश सावंत आणि सॅमुअल मिरांडाद्वारे सुशांतला ड्रग्सचा पुरवठा करायचा असा खुलासा एनसीबीने केला. कमरजीरने आतापर्यंत १० वेळा सुशांतला ड्रग्सचा पुरवठा केला आल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, एनसीबीने गोवा येथून ड्रग पेडलर ख्रिस कोस्टा याला अटक केली आहे. गोव्यातून स्वतःचा ड्रग्स व्यवसाय करणारा ख्रिस कोस्टा केमिकल ड्रग्सचा व्यापार करतो. शिवाय या प्रकरणात आणखी एक नाव समोर येत आहे ते म्हणजे ड्वेन (Dwayne). ड्वेनने कित्येकदा दीपेश सावंत आणि शोविकला ड्रग्सचा पुरवठा केला आहे.
या सर्वांपैकी, कैझान इब्राहम हा अनुज केसवानी आणि करमजित यांच्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. आतापर्यंत शोमिकचा कैझान इब्राहम, अनुज केसवानी आणि ड्वेन यांच्याशी थेट संबंध असल्याचं समोर येत आहे.