गोवा : सिनेमातील पडद्यावर अवतरलेली जगभरची संस्कृती आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या भारताच्या 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरूवात होणार आहे. 


शाहरूखच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोव्यातल्या शामाप्रसाद मुखर्जी सभागृहात शाहरूख खानच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होईल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह सिनेक्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत या महोत्सवाचं उद्घाटन सोहळा रंगेल. 


85 देशातील 220 सिनेमांचा पिटारा उघडणार


इराणी दिग्दर्शक माजिक मजिदी यांच्या बियाँड द इमेज या सिनेमाने 85 देशातील 220 सिनेमांचा पिटारा खोलला जाईल. यंदा पॅनोरमा विभागात तब्बल अकरा मराठी सिनेमे प्रदर्शित होतील. 


या सिनेमांचीही पर्वणी


यात मराठीतील कासव ,पिपंळ ,कच्चा लिंबू ,रेडु ,मुरांबा माझा भिरभिर ,ईदक ,व्हेंटिलेटर ,क्षितिज  या नऊ चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय बलुतं आणि खिडकी या मराठी  लघुपटांचाही महोत्सवात समावेश आहे .