मुंबई : 'गोल्ड' आणि 'सत्यमेव जयते' १५ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर रिलीज झाले. एकीकडे जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते तर दुसऱ्या बाजूस अक्षय कुमारचा गोल्ड सिनेमा एकाचवेळी प्रेक्षकांच्या भेटीस आला. दोघांनी रिलीजच्या दिवशी चांगली कमाई केली पण दुसऱ्या दिवसाच्या कमाईने सिनेनिर्मात्यांची घोर निराशा झाली.


'गोल्ड'ची कमाई 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय कुमारच्या गोल्ड सिनेमाने रिलीजच्या पहिल्यादिवशी २५ कोटींचा व्यवसाय केला तर दुसऱ्या दिवशी ८ कोटीच कमावले याचा अर्थ एकूण ३३ कोटींची कमाई सिनेमाने केली.



'सत्यमेवर जयते'ची कमाई 


जॉन अब्राहमचा सिनेमा सत्यमेव जयतेने २०.२५ कोटींचा व्यवसाय केला तर दुसऱ्या दिवशी केवळ ७.९२ कोटींचाच गल्ला जमवला. यानंतर सिनेमाची एकूण कमाई २८.४४ कोटी झाली आहे. ट्रेण्ड अॅनालिस्ट तरण आदर्शच्यामते येणाऱ्या दिवसात सिनेमा बंपर कमाई करेल कारण अजूनही विकेंड येणं बाकी आहे.