Golden Globe Awards 2023: राजामौलींच्या RRR ने रचला इतिहास , Naatu Naatu गाणं ठरलं सर्वोत्कृष्ट
Golden Globe Awards 2023: जगभरातील चित्रपट गोल्डन ग्लोब मध्ये RRR या चित्रपटातील `नाटू नाटू` गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणं म्हणून पुरस्करीत करण्यात आले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची बाब आहे.
Golden Globe Award 2023 : द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (The Academy of Motion Picture Arts and Sciences) यांनी नुकतीच 95 व्या ऑक्सरसाठी जगभरातील 301 सिनेमांची रिमांइंडर लिस्ट जाहीर करण्यात आली. यामध्ये जगभरातील वेगवेगळ्या भाषेमधील तब्बल 300 हून अधिक सिनेमांमधील यादित भारतातील कांतारा (Kantara), गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi), द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) बरोबरच मी वसंतराव (Mi Vasantrao) या मराठी चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे साऊथचा RRR चित्रपटातील 'नाटू नाटू' (Naatu Naatu) या गाण्याने गोल्डन ग्लोब (Golden Globe 2023) हा पुरस्कार पटकाला आहे. सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणं म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे.
RRR च्या 'नाटू नाटू' गाण्याला पुरस्कार
एसएस राजामौली (SS Rajmouli) यांचं दिग्दर्शन असलेला RRR हा ब्लॉकबस्टर चित्रपट आणि त्यातलं नाटू नाटू (Naatu Naatu Song) हे गाणं जगभरात गाजलं आहे. याचं गाण्याने आता हॉलिवूडच्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी असलेला हा गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावला आहे. एसएस राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे.
सर्वत्र चित्रपटाचे कौतुक
80व्या गोल्डन ग्लोब अवॉर्डस 2023 अमेरिकेत 10 जानेवारील रात्री 8 वाजता सुरू झाले. परंतु भारतीय प्रेक्षकांना आज (11 जानेवारी 2023) रोजी पाहता येणार आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा आर आर या चित्रपटाने जगभरात आपली जादू दाखवली आहे. सर्वत्र या चित्रपटाचे कौतुक केलं जात आहे.
नाटू नाटू गाणं हे वर्ष 2022 मध्ये हिट गाण ठरले आहे. याचे तेलुगू भाषेतील गाणे हे काला भैरवा आणि राहुल सिप्लीगुंजने यांनी मिळून लिहिले होते. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले आहे. कीरवाणी गोल्डन ग्लोब पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर उपस्थित होते.
आरआर या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्यासोबत टेलर स्विफ्टचं गाणं कॅरोलीना Guillermo del Toro’s Pinocchio चे गाणे 'ciao papa', 'टॉप गनः मैवरिक' चं गाणं 'होल्ड माय हॅण्ड', लेडी गागा, ब्लडपॉप और बेंजामिन राइसचं गाणं 'लिफ्ट मी अप' लाही गोल्डन ग्लोबच्या अवॉर्डसाठी नामांकन मिळालं होतं. मात्र या गाण्यांना मागे टाकत एसएस राजामौली यांच्या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याने हा पुरस्कार मिळवला आहे.