मुंबई : हॉलिवू़डमधील अतिशय लोकप्रिय आणि गाजलेल्या जेम्स बॉण्ड या चित्रपटाच्या सीरिजमधील 'गोल्डफिंगर' या १९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून झळकलेल्या अभिनेत्री मार्गरेट नोलान यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'जेम्स बॉण्ड गर्ल' म्हणूनही त्या ओळखल्या जात होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोलान यांचा मुलगा ऑस्कर यानं यासंदर्भातील बातमी माध्यमांना दिली. ५ ऑक्टोबरलाच नोलान यांचं निधन झाल्याचं म्हटलं जात आहे. दिग्दर्शक एडगर राईट यांनी ट्विटरवर नोलान यांना श्रद्धांजली वाहिली. 


'अभिनेत्री मार्गरेट नोलान यांच्या निधनाचं वृत्त सांगणं हे अतिशय दु:खद आहे. त्यांना बीटल्स आणि आयकॉनिक बॉण्डसह पाहिलं गेलं होतं', असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं. 'गोल्डफिंगर' चित्रपटाचं पोस्टर, अनेक विक्रम, पुस्तकं आणि चित्रांवर मार्गरेट यांचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता. 


 


अनेक दशकांपूर्वी त्यांनी अभिनय कारकिर्दीची सुरवात केली होती. २०११ मध्ये 'द पॉवर ऑफ टू मॅन' या चित्रपटातून झळकल्या होत्या.