मुंबई : बाहुबली 2 पाठोपाठ यंदा 'गोलमाल अगेन' ही यंदाची सुपरहीट फिल्म ठरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल अगेन' हा चित्रपट 'गोलमालचा  चौथा सिक्वेल आहे.  'गोलमाल अगेन' चित्रपटामध्ये अजय देवगन महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे. 'गोलमान अगेन' हा चित्रपट हॉरर कॉमेडी जॉनरमधील आहे.  


यंदा सलामान खान,आमिर खान, शाहरुख या तिघांनाही पिछाडीवर टाकत अजय देवगणने नवा विक्रम  केला आहे. वर्ल्ड वाईड 'गोलमाल अगेन'ने २१५ कोटींची कमाई केली आहे.  


अजय देवगणने केला नवा विक्रम 
अजय देवगणने आत्तापर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले आणि रचले देखिल. आजपर्यंत 'सिंघम रिटर्न्स' हा अजय देवगणच्या करिअरमधील सुपरहीट चित्रपट आहे. या चित्रपटाने १४०.६२ कोटींची कमाई केली आहे. सिंघम नंतर 'गोलमाल अगेन' हा चित्रपट सुपरहीट ठरला आहे. 


२० ऑक्टोबर रोजी 'गोलमाल अगेन' हा चित्रपट रसिकांच्या भेटीला आला. यामध्ये अजय देवगण, तब्बू, अर्शद वारसी, परिणीती चोप्रा, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू आहेत.