सोनमच्या घरी लवकरच हलणार पाळणा , फोटो शेअर करत दिली माहिती
अभिनेत्री सोनम कपूरच्या प्रेग्नंसीच्या बातम्या सतत समोर येत आहेत.
मुंबई : जेव्हापासून बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लंडनहून भारतात परतली आहे, तेव्हापासून तिच्या प्रेग्नंसीच्या बातम्या सतत समोर येत आहेत. एअरपोर्टवर सोनमला पाहिल्यानंतर लोक गुडन्यूजची वाट पाहत आहेत. त्याचबरोबर अलीकडेच पार पडलेल्या रिया कपूरच्या लग्नातही सर्वांची नजर बहीण सोनमवर होती.
रियाच्या लग्नाचे फोटो पाहिल्यानंतर तिच्या प्रेग्नंसीबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान, कपूर कुटुंबात बेबी शॉवर करण्यात आला आहे, पण तो सोनमचा बेबी शॉवर नाही तर तिचा भाऊ मोहित मारवाहची पत्नी अंतरा मोतीवालाचा आहे.
मोहित आणि अंतरा लवकरच पालक होणार आहेत. सोनमने स्वतः तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये हे कौटुंबिक बेबी शॉवरसाठी लिहिलं आहे. फोटोमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, सगळे भावंडं त्यांच्या वहिनी आणि भावासोबत कसे पोझ देत आहेत.
या फोटोत, सोनम सोबत, रिया कपूर, संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूर, अर्जुन कपूर, अंशुला कपूर, खुशी कपूर दिसत आहेत.शनाया लवकरच करण जोहरच्या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. दुसरीकडे, श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूर देखील बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यास तयार आहे.