घटस्फोटांच्या चर्चेनंतर समंथा अक्किनेनीकडून चाहत्यांना गुडन्यूज
दक्षिणात्य भारतीय अभिनेत्री आणि नागा चैतन्याची पत्नी समंथा अक्किनेनी घटस्फोटांच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे.
मुंबई : दक्षिणात्य भारतीय अभिनेत्री आणि नागा चैतन्याची पत्नी समंथा अक्किनेनी गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे आणि घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेृ. तिच्याबद्दल चाहत्यांमध्ये सध्या निराशा आहे. अशा परिस्थितीत, आता तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहणारी सामंथा अक्किनेनी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते आणि एकापाठोपाठ एक स्वतःशी संबंधित पोस्ट शेअर करत असते. असं दिसतं की ती खूप आनंदी आहे. आणि तिच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचा वाद नाही.
मात्र तिच्या चाहत्यासाठी आता एक गुडन्यूज आहे. समंथाने फेमिनाच्या 40 सर्वोत्तम महिलांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. ज्यासाठी अभिनेत्रीनं आभारही मानले आहेत. Femina's Fabulous 40च्या वतीने समंथाला टॅग करत, असं ट्विट करण्यात आलं आहे की, 'चार फिल्मफेअर पुरस्कार, दोन नंदी पुरस्कार, चार दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि तीन सिनेमा पुरस्कार मिळवलेल्या सामंथा तामिळ आणि तेलगू सिनेसृष्टीत फेवरेट लिस्टमध्ये आहेत.
तिने या वर्षी वेगळ्या असलेल्या 40 महिलांना स्थान मिळवून दिलं आहे. तिने फेमिनाचं फॅबुलस 40 चं ट्विट रिट्विट करून त्यांचे आभार मानले आहेत. तिने रिट्विट करत लिहिलं, 'माझ्यासाठी हा खरोखर सन्मान आहे. धन्यवाद.'
तिने 2014 मध्ये प्रत्युषा सपोर्ट ट्रस्टची स्थापना केली. ज्याचं काम महिला आणि मुलांना वैद्यकीय सुविधा पुरवणं आहे. एवढंच नव्हे तर वैद्यकीय परिस्थितीमुळे ग्रस्त मुलांच्या इच्छा देखील ती पूर्ण करते. यासोबतच अभिनेत्रीने फेमिना मिस इंडिया २०२० मध्ये उपविजेती सुश्रुती कृष्णा यांच्या सहकार्याने साकी नावाचा ऑनलाइन परवडणारा ब्रँड सुरू केला. हे सगळं असूनही, सामंथाने हैदराबादमध्ये लोक कल्याणासाठी एक प्री स्कूल, एकम अर्ली लर्निंग सेंटर देखील सुरू केलं आहे. याद्वारे त्यांनी शिक्षण क्षेत्रातही पाऊल टाकलं.