मुंबई :  स्टार प्रवाह वरील मालिका आई कुठे काय करते प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने अवघ्या कमी वेळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली. एवढंच नव्हेतर या मालिकेतील प्रेत्येक कलाकारावरही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. या मालिकेमुळे हे कलाकार इतके लोकप्रिय झाले की, या कलाकारांना प्रेक्षक त्यांच्या खऱ्या नावापेक्षा त्यांच्या पात्राच्या नावाने ओळखू लागले. या मालिकेतील अभिनेत्री अभिनेत्री अश्विनी महांगडे आई कुठे काय करते मालिकेतून घरा-घरात पोहचली आहे. सोशल मीडियावर अश्विनीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. या मालिकेत ती अनघा हे पात्र साकारत आहे. मात्र आता अभिनेत्रीच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच अश्विनीने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अभिनेत्री गाडीतून उतरुन एका इमारतीकडे जाते. यानंतर लिफ्टमधून एका फ्लॅटच्या दिशेने जाते. मग दरवाजा उघडून आत जाते आणि तिच्या घराची झलक दाखवते. तिच्यासोबत तिचा पतीही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने खूप सुंदर कॅप्शन लिहीलं आहे. तिची ही पोस्ट काही वेळातच व्हायरल होत आहे. चाहत्यांनी तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत अभिनेत्रीवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. अभिनेत्रीने नुकतंच नवं घर खरेदी केलं आहे.


हा व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री अश्विनी महांगडेने कॅप्शनमध्ये लिहीलंय की,  ''We did it together आपल्या कामात #राम शोधला की स्वप्नं पूर्ण होतातच. अर्थात स्वप्नं एकाचं असलं तरी त्या साठी बळ देणारे हात फार महत्त्वाचे असतात. या स्वप्नासाठी आम्हाला कोणत्या न कोणत्या कारणाने मदत करणाऱ्या सगळ्यांचेच आम्ही ऋणी आहोत.पहिल्या पायरीपासून ते 21 मजले हा प्रवास तसा काही मिनिटांचा आहे पण आम्हाला खूप वेळ लागला. चांगले - वाईट, सुख - दुःख असे सगळेच सोबत घेवून पुढे आलो आणि हे एक स्वप्न पूर्ण करू शकलो. My Lucky charm - सारू. स्वामींच्या घरी पोहोचलो. '' तिची ही पोस्ट काहीच वेळात व्हायरल होवू लागली आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अनेकांनी तिच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत लिहीलंय की, खूप खूप अभिनंदन ताई  सार्थ अभिमान वाटतो दोघांचाही. तर अजून एकाने लिहीलंय की, खूप खूप अभिनंदन   अश्विनी ताई. तर अजून एकाने म्हटलंय, अभिनंदन स्वामी तुझी सगळी स्वप्न पूर्ण करतील. तर अशा अनेकप्रकारच्या कमेंट चाहते तिच्या या पोस्टवर करत आहेत.