शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, सप्टेंबरमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार `हे` चित्रपट
Shah Rukh Khan : आता शाहरुखचे `हे` 2 चित्रपट सप्टेंबरमध्ये होणार प्रदर्शित
Shah Rukh Khan : बॉलिवूडनं आजवर अनेक गाजलेले चित्रपट दिलेत. त्यात अनेक हॉरर, कॉमेडी, रोमान्स अशा वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट आपण पाहिलेत. आता बॉलिवूडचे अनेक चित्रपट थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होत आहेत. हे सगळं इम्तियाज अली यांच्या रॉकस्टार या चित्रपटानंतर सुरु झालं. हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर प्रेक्षकांकडून चांगली प्रतिक्रिया मिळू लागली होती. आता शाहरुख खानचे दोन चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत.
बॉलिवूड हंगामानं दिलेल्या रिपोर्टनुसार, सप्टेंबर महिन्यात शाहरुख खानचा परदेस हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानचा परदेस हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री महिमा चौधरी आणि अपूर्व अग्निहोत्री दिसले होते. हा चित्रपट 20 सप्टेंबर किंवा 27 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
शाहरुख खानचा दुसऱ्या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर त्याचा जो दुसरा चित्रपट आहे जो प्रदर्शित होणार आहे तो आहे वीर-जारा. वीर-जारा हा शाहरुख खानचा सगळ्यात चांगला आणि रोमॅन्टिक चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खानसोबत अभिनेत्री प्रीति झिंटा महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. शाहरुख खानचा हा चित्रपट 13 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. असं म्हटलं जातं की दररोज चित्रपटांमध्ये काही शो असणार आहेत आणि जशी प्रेक्षकांची मागणी असेल तसे शो वाढवण्यात येतील.
शाहरुख खानच्या या चित्रपटांशिवाय सप्टेंबरमध्ये ऐश्वर्या राय बच्चनचा ताल हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ऐश्वर्या रायशिवाय अनिल कपूर आणि अक्षय खन्ना दिसणार आहेत. सप्टेंबर 13 रोजी हॉरर चित्रपट तुम्बाड प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट आधी 30 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा : आई-बाबा झाले अंकिता-विकी! VIDEO शेअर करत दाखवला चेहरा
जे चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाले त्यात 'हम आपके हैं कौन', 'दंगल', 'लव आजकल', 'गँग्स ऑफ वासेपुर' आणि 'लैला मजनू' सारखे चित्रपट आहेत. दरम्यान, आता हेच चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्यानं सगळ्या प्रेक्षकांचा आनंद हा गगनात मावेनासा झाला आहे.